आपण आपल्या प्रत्येक लाडक्या कलाकाराला इन्स्टाग्रामवर फॉलो करत असतो. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा करत असतो. बरेच कलाकार जाहिरातीसाठीसुद्धा अनेक पोस्ट करत असतात. त्याला पेड पोस्ट असं म्हटलं जातं. यामधून हे कलाकार लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपये कमवतात. आज आपण अशाच काही कलाकरांबद्दल जाणून घेणार आहोत.
एबीपीने दिलेल्या एका वृत्तानुसार,अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तब्बल 1 कोटी रुपये रक्कम घेते.
इन्स्टाग्रामवर विराटचे 14.7 कोटी फॉलोअर्स आहेत. ग्लोबल लिस्टमध्ये क्रिकेटर विराट कोहलीचा 19 व्या स्थानावर समावेश होतो, मात्र भारतात त्याचा पहिला क्रमांक आहे. विराट इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी सर्वाधिक रक्कम घेणारा सेलेब्रेटी आहे. आपल्या एका पेड पोस्टसाठी विराट जवळजवळ 5 कोटी रुपये घेतो.
गोल्बल स्टार बनलेल्या प्रियांका चोप्राचेसुद्धा अफाट फॉलोअर्स आहेत. ती आपल्या एका पेड पोस्टसाठी तब्बल 3 कोटींपर्यंत रक्कम घेते.
प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर नेहा कक्करचासुद्धा या यादीत समावेश होतो. नेहा आपल्या एका पेड पोस्टसाठी तब्बल 75 लाख रुपये घेते.