जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / चॅलेंज!ओळखा पाहू फोटोतील 'स्कुल गर्ल'ला, आज आहे बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्री

चॅलेंज!ओळखा पाहू फोटोतील 'स्कुल गर्ल'ला, आज आहे बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्री

चॅलेंज!ओळखा पाहू फोटोतील 'स्कुल गर्ल'ला, आज आहे बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्री

फोटोमध्ये दिसणारी ही स्कुल गर्ल आज बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करतेय.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई, 16 मार्च-  आपला फिटनेस, स्टाईल आणि फॅशनमुळे बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) कायम चर्चेत असते. बोल्ड फोटोशूट (Bold Photoshoot) असो किंवा वर्कआउटचे व्हिडिओ (Workout Video) असो तिची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर (Social Media) चर्चिली जाते. याशिवाय तिच्या लव्हलाईफबाबतही (Lovelife) नेटिझन्समध्ये कायम उत्सुकता असते. दिशा पटानी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या स्कूल लाईफमधील (Schoollife) एक फोटो व्हायरल झाला आहे. आजकाल इंटरनेटवर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांच्या बालपणीचा फोटो व्हायरल (Childhood Photos) करून तो कलाकार ओळखायला सांगायचा ट्रेंड आला आहे. अशा एका चॅलेंजदरम्यान दिशा पटानीचा शाळेतील फोटो पोस्ट केला गेला आहे. या फोटोमध्ये ती शाळेतील एका स्पर्धेदरम्यान तिच्या मैत्रिणीसोबत दिसत आहे. या फोटोत दिशा खाली बघते आहे आणि चेहऱ्यावरील निरागस हास्य दिसत आहे. सलमान खान, सुशांतसिंह राजपूतसह अनेक स्टार्ससोबत काम केलेली दिशा अनेक तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नॉन-फिल्मी बॅकग्राउंडमधून आलेल्या दिशानं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे. या सुपरहॉट मॉडेल आणि अभिनेत्रीचं उत्तर प्रदेशशी (UP) खूप जवळचं नातं आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. 13 जून 1992 रोजी बरेली (Bareilly) येथे दिशाचा जन्म झाला. दिशाचे वडील जगदीश पटानी यूपी पोलिसदलात सीओ म्हणून कार्यरत आहेत. उत्तराखंडमधील टनकपूर येथील अंबाग गाव हे पटानी कुटुंबाचं मूळगाव आहे. वडिलांच्या नोकरीमुळे दिशाचं संपूर्ण कुटुंब बरेलीला आलं. जगदीश पाटानी यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी खुशबू सैन्यात कॅप्टन आहे. दिशा ही त्यांची धाकटी मुलगी आहे. दिशाचा भाऊ सूर्यांश तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दिशानं जीपीएमनंतर बीबीएल स्कूलमधून इंटरपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर लखनऊमधील एमिटी युनिव्हर्सिटीमधून (Amity University) तीनं बीटेकची पदवी घेतली. 2012-13 मध्ये ‘पँटालून्स फेमिना मिस इंडिया स्पर्धे’त फर्स्ट रनरअप झाल्यानंतर ती मुंबईला शिफ्ट झाली.

    News18

    सध्या कामानिमित्त दिशा मुंबईमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, ती कुटुंबाला आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळ काढून बरेलीला भेट देत असते. 2016मध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी दिशा तिच्या घरी गेली होती. जून 2021मध्ये, आई-वडील आणि भावाला कोरोना झाल्यानंतरही ती चौपाला येथील तिच्या राहत्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी कुटुंबीय आणि खास लोकांना भेटल्यानंतर ती एक दिवस राहून मुंबईला परतली होती. एका मुलाखतीदरम्यान दिशाच्या वडिलांनी तिच्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दिशा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. ती नेहमी टीव्हीवर डिस्कव्हरी चॅनल पाहायची. तिला वन्यजीव तज्ज्ञ होऊन प्राण्यांवर संशोधन करायचं होतं. 2011मध्ये दिशाला एमिटी युनिर्व्हसिटीत बीटेकसाठी प्रवेश मिळाला. तिची हाईट आणि बोलण्याची पद्धत चांगली असल्यानं ‘मिस फ्रेशर्स’म्हणून तिची निवड झाली. एकदा दिशा आणि तिच्या काही मैत्रिणींनी लखनऊमधील एका मॉडेलिंग(Modelling) स्पर्धेत सहभाग घेतला. तिथे दिशाला बक्षिस मिळालं.’ यानंतर तिच्या मित्रांनी तिला याच क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. मात्र, या निर्णयाला दिशाच्या वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला होता. कारण, तिच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती चित्रपटसृष्टीत नव्हती. पण, दिशाचा निश्चय पाहून नंतर त्यांनी तिला परवानगी दिली. जेव्हा दिशा मुंबईला आली होती तिच्याकडे फक्त 500रुपये होते. एका मुलाखतीत दिशानं याबाबत सांगितलं होतं, ‘मी अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी अभ्यासमध्येच सोडला. बी.टेक करत असताना मला मॉडेलिंगची असाइनमेंट मिळाली. त्यानंतर ग्लॅमर इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी मी मुंबईला आले. मुंबईमध्ये एकटी राहून तिनं काम केलं. तिनं कधीही कुटुंबाची मदत घेतली नाही. केवळ 500रुपये घेऊन मुंबईत पोहोचलेल्या दिशानं इतकी प्रगती केली आहे की, आज मुंबईतील वांद्र्यामध्ये स्वत:चं आलिशान घर आहे. दिशानं 2015 मध्ये वरुण तेजसोबत ‘लोफर’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर दिशानं एक म्युझिक व्हिडिओही केला होता. दिशानं आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटातून आपले अॅक्टिंग स्कील्स सिद्ध केलं. तिनं 2016 मध्ये ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या हिट चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलीवूडमध्ये हिट चित्रपट केल्यानंतर दिशानं चीनचे प्रसिद्ध कलाकार जॅकी चॅन यांच्यासोबत ‘कुंग फू योगा’ या चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यानंतर तिनं टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) बागी 2, भारत, मलंग आणि राधे यांसारख्या चित्रपटांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवलं. (हे वाचा: अमृता रावने 9 वर्षानंतर शेअर केला लग्नाचा फोटो,असा होता अभिनेत्रीचा वेडिंग LOOK ) दिशा पटानी तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. दिशाच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर ती बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला (Tiger Shroff) डेट करत आहे. टायगरची बहीण कृष्णा श्रॉफसोबत दिशाचे खूप चांगले संबंध आहेत. तिघेही जिममध्ये एकत्र वर्कआउट करताना दिसत असतात. टायगरच्या आईसोबतही दिशाचं चांगलं बाँडिंग आहे. दिशा आणि टायगरनं कधीही आपलं रिलेशन ऑफिशियल जाहीर केलं नाही. परंतु, दोघांमधील जवळीक सर्व काही सांगून जाते. याशिवाय दिशा तिच्या ग्लॅमरस आणि जबरदस्त फोटोशूटमुळेही सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. सध्या दिशा अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ती लवकरच एक व्हिलन रिटर्न्स, केटीना आणि योद्धा या चित्रपटात दिसणार आहे. एक व्हिलन रिटर्न्समध्ये अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया यांच्यासोबत ती स्क्रीन शेयर करणार आहे. या चित्रपटात दिशा स्वतःच अनेक स्टंट करताना दिसणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात