मुंबई, 10 जुलै : बाॅलिवूडमधील सर्वात हाॅट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी दिशा पाटनी (disha patani)नेहमीच तिच्या हटके लुकमुळे चर्चेत असते. सध्या दिशा तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिशा पाटनी (Disha patani upcoming movie)तिचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या(ek villain return) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनवेळी दिशाचा अनोखा अंदाज, बोल्डनेस, इंटनेटचं तापमान वाढवत आहे. त्यामुळे दिशाचे(Disha patani bold look) प्रमोशनवेळीचे लुक सध्या व्हायरल होताना दिसत आहे. अलिकडेच दिशा मुंबईतील एका मॉलमध्ये 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाचे प्रमोशन (Ek villain returns movie promotion)करताना दिसली.
दिशा पाटनी मुंबईतील माॅलमध्ये प्रमोशनसाठी आली तेव्हा तिचा लुक पाहून चाहते घायाळ झालेले पहायला मिळाले. यावेळी दिशाने पिवळ्या रंगाचा शॉर्ट आणि डीप नेक टॉप घातला होता. दिशानं यावर न्यूड मेकअप केला असन केसांचे दोन बो घातले आहेत. दिशा या लुकमध्ये एकदम 'बार्बी डाॅल' सारखी दिसत होती. अभिनेत्रीच्या या लुकचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा - Bhagyashree Mote : भाग्यश्रीने शेअर केली अशी पोस्ट; चाहता म्हणाला, 'आग कशी लावायची हे तुझ्याकडून शिकावं'
दिशाचा नवा लुक चाहत्यांना खूपच आवडला असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तर काहींनी तिला खूप छोटा टाॅप घातल्यामुळे ट्रोलही केलं आहे. काहींनी दिशाची तुलना उर्फी जावेदसोबतही केली (Disha patani look compare with urfi javed)आहे. 'यांनी काहीही घातलं तरी क्यूट मात्र उर्फीनं काही घातलं तर चुकीचं', असं काही ट्रोलर्सनी म्हटलंय.
View this post on Instagram
'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिशा पाटनीशिवाय जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 29 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना सस्पेन्स, रोमान्स आणि भरपूर अॅक्शन पहायला मिळणार आहे. याशिवाय दिशा 'योधा' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Bollywood News, Disha patani, Entertainment