जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Dia Mirza Wedding: दीपिका, अनुष्काला टाकलं मागे; सोशल मीडियावर दिया मिर्झाचे लग्नातील PHOTO VIRAL

Dia Mirza Wedding: दीपिका, अनुष्काला टाकलं मागे; सोशल मीडियावर दिया मिर्झाचे लग्नातील PHOTO VIRAL

Dia Mirza Wedding: दीपिका, अनुष्काला टाकलं मागे; सोशल मीडियावर दिया मिर्झाचे लग्नातील PHOTO VIRAL

ज्या इमारतीमध्ये दीया मिर्झा राहते, त्याच इमारतीमध्ये असणाऱ्या एका मोठ्या गार्डनमध्येच त्यांचं लग्न झालं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) आणि वैभव रेखी (Vaibhav Rekhi) सोमवारी लग्नबंधनात अडकले. ‘रेहना है तेरे दिल मै’ (Rehnaa Hai Terre Dil Mein) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या दिया मिर्झाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिया मिर्झाचा पती वैभव रेखी मुंबईतील पाली हिल भागात राहतो. ज्या इमारतीमध्ये दिया मिर्झा राहते, त्याच इमारतीमध्ये असणाऱ्या एका मोठ्या गार्डनमध्येच त्यांचं लग्न झालं. नववधू रुपातील दिया मिर्झा लाल रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत असून पतीसोबत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिया मिर्झाचा पती बिझनेसमॅन असून तो फायनेंशियल इंवेस्टमेंटचंही काम करतात.

जाहिरात

(वाचा -  39 व्या वर्षीच दियानं घातला लग्नाचा घाट; दुसऱ्या पतीचा बिझनेस पाहून व्हाल थक्क )

दिया मिर्झाचा हा दुसरा विवाह आहे. यापूर्वी दियाचं लग्न साहिल संघासोबत झालं होतं. त्यानंतर काही वर्षांनी दोघांचे मार्ग वेगळे झाले. साहिल संघासोबत घटस्फोट घेतल्यानंतर दिया आता वैभव रेखीशी विवाहबद्ध झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात