• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'या' तरुण नेत्याला पाहायचं पंतप्रधानपदी; दीपिका पादुकोनची इच्छा होणार का पूर्ण?

'या' तरुण नेत्याला पाहायचं पंतप्रधानपदी; दीपिका पादुकोनची इच्छा होणार का पूर्ण?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनला (Deepika Padukone) देखील तिच्या आवडत्या नेत्याला देशाच्या पंतप्रधानपदी Prime Minister of India) पाहायचे आहे. एका मुलाखती दरम्यान दीपिकाने तिची ही इच्छा बोलून दाखवली(Deepika Padukone's favorite leader) आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 ऑक्टोबर : देशातील राजकारणावरून किंवा राजकीय नेत्यांबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असते. प्रत्येकाला आपला आवडता नेता सत्तेत पाहायचा असतो. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनला (Deepika Padukone) देखील तिच्या आवडत्या नेत्याला देशाच्या पंतप्रधानपदी (Prime Minister of India) पाहायचे आहे. एका मुलाखती दरम्यान दीपिकाने तिची ही इच्छा बोलून दाखवली(Deepika Padukone's favorite leader) आहे. एकवर्षापूर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन विद्यापीठात गेली होती. दीपिका पादुकोनची ही भूमिका पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावेळी तिच्याविरोधात सोशल मीडियावर #boycottchhapaak ट्रेंड सुरु झाला होता. काही वेळातच तिचा ‘छपाक’ या चित्रपटावर वर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली होती. हे सगळं सुरू असताना दीपिका आणखी एक वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. दीपिकाला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे आणि तशी दीपिकाने इच्छा देखील व्यक्त केली होती. तिच्या या वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती. दीपिकाचा सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दीपिका कॉंग्रेस नेते राहुल गांधी( Rahul Gandhi )यांची प्रशंसा करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका एका मुलाखत देत आहे. यावेळी निवेदकाने तिला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा की, तुला कोणत्या रारकीय नेत्याचे काम आवडते किंवा त्याच्याकडून प्रेरणा मिळते. वाचा. घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO यावेळी उत्तर देताना दीपिका म्हणाली होती की, मला राजकारणाविषयी फारसं काही माहित नाही. मात्र मी  राहुल गांधी यांना ते जे काम करत आहेत ते टीव्हीवर पाहत असते. देशासाठी ते चांगल काम करत आहे. यावेळी ते नक्की पंतप्रधान होतील अशी मी अशा करते ..असं दीपिका म्हणताना दिसत आहे. वाचा, वाढदिवसाला मलायका अरोराने अर्जुन कपूर आणि करिना कपूरसोबत केली लेट Night Party... दीपिकाच्या कामाविषयी सांगायचे झालं तर तिच्याकडे दोन हॉलिवूडचे चित्रपट आहेत. यासोबतच ती अनेक जाहिरातमीध्ये देखील दिसणार आहे. तसेच पती रणवीर सिंह सोबत 83 या चित्रपटात देखील दिसणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: