भूमी पेडणेकरने ट्वीट करत बाळासाठी ब्रेस्ट मिल्कची मागणी केली आहे, भूमीने म्हटलं आहे, ‘2 महिन्याच्या बाळाच्या आईचं कोरोनाने निधन झालं आहे. बांकुरा जवळ राहणाऱ्या या बाळाला आईच्या दुधाची अत्यंत गरज आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या महिला स्तनपान करतात, आणि ज्या आपलं दुध ‘फ्रीज’ करू शकतात अशा महिलांनी पुढाकार घ्यावा.2 month baby, mother passed from covid,urgently needs breast milk donations near Bankura, West Bengal-lactating mothers who can freeze the milk themselves to directly come forward,he can collect frozen milk once a week from Kolkata, Durgapur, Bankuura, Bishnupur DM @RaveenaPatel
— bhumi pednekar (@bhumipednekar) May 20, 2021
त्या कोलकत्ता, बांकुरा, दुर्गापूर आणि बिनशपूर मधून आठवड्यातून एक वेळा दुध जमा करू शकतात. त्यासाठी रविना पटेलला एक मेसेज करा. भूमी पेडणेकरचा हा ट्वीट सध्या खुपचं व्हायरल होतं आहे. अनेक कलाकारांनी भूमीला कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. भूमी पेडणेकर या काळात अनेक लोकांना मदत करत आहे. काही दिवसांपूर्वीच भूमीने ट्वीट करत या परीस्थिततून लवकरच बाहेर पडू असा दिलासा चाहत्यांना दिला होता. (हे वाचा:शिवानी बावकर चाहत्यांकडे मागतेय आर्थिक मदत; हवं आहे 16 कोटींचं इंजेक्शन ) इतर अनेक कलाकारांप्रमाणे भूमी पेडणेकरसुद्धा कोरोना काळात मदत करत आहे. त्यासाठी तिने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. भूमीने सुरुवातीला 5 लोकांसोबत कोरोना योद्धाची सुरुवात केली होती. मात्र सध्या यामध्ये 200 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे. हे लोक 24 तास लोकांना मदत पोहचविण्यासाठी कष्ट घेत आहेत. रुग्णांना ऑक्सिजन, बेड, पाल्झ्मा आणि औषधे सुद्धा पुरवण्याचं काम करत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhumi pednekar, Coronavirus