• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘स्तनपानासाठी दुसऱ्या खोलीत का पाठवतात?’ अमृतानं समाजातील विकृतीवर व्यक्त केली खंत

‘स्तनपानासाठी दुसऱ्या खोलीत का पाठवतात?’ अमृतानं समाजातील विकृतीवर व्यक्त केली खंत

बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress) अमृता राव (Amrita Rao) आणि RJ अनमोल (Anmol)यांचा मुलगा आत्ता सहा महिन्यांचा झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 मे-  बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress) अमृता राव (Amrita Rao) आणि RJ अनमोल (Anmol)यांचा मुलगा आत्ता सहा महिन्यांचा झाला आहे. अमृता आणि अनमोल आपल्या मुलासोबतचे खास क्षण चाहत्यांसोबत शेयर करत असतात. अमृताने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो सुद्धा शेयर केले आहेत. आज मदर डेच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अमृताने आपल्या मातृत्वावर (Motherhood) मनमोकळे पणाने संवाद साधला आहे.
  ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अमृतानं म्हटलं आहे, ‘हे खुपचं वेगळ आहे. मला चांगलं आठवत गेल्या वर्षी मदर्स डेच्या निमित्ताने माझं पूर्ण कुटुंब माझ्यासोबत होतं. आणि मी गर्भवती होते. माझं पोट आलं होतं. मात्र या मदर्स डेला तो माझ्या कुशीत आहे. हे खुपचं खास आहे. यापेक्षा मोठा दुसरा कोणताच आनंद असू शकत नाही’. (हे वाचा:ट्विटरनंतर आता इन्स्टानेही घेतला कंगनाशी पंगा; कारवाई केल्यानं भडकली अभिनेत्री  ) तसेच अमृताला स्तनपान बद्दल सुद्धा प्रश्न विचारण्यात आले, यावर बोलताना ती म्हणते,’ मला वाईट वाटत हे बघून की आजही स्तनपान आपल्यासाठी एक अवघडलेली गोष्ट आहे. अजूनही स्तनपान करणं म्हणजे खुपचं काहीतरी वेगळी गोष्ट समजली जाते. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या स्त्रीला दुसऱ्या खोलीत पाठवलं जात. मात्र सुदैवाने माझ्या घरी असं वातावरण अजिबात नाहीय. माझ्या सासरची लोक खुपचं छान आहेत. आणि खासकरून याच पूर्ण श्रेय माझ्या सासूबाईनां जात. कारण त्या मला नेटाने सांगतात स्तनपानसाठी मला दुसऱ्या खोलीत जायची गरज नाहीय. आणि मला इतरांसारखंचं बिनधास्त राहण्याचा सल्ला त्या देतात.’ (हे वाचा: Mother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम) मातृत्वाबद्दल बोलताना अमृता म्हणते, आईपण बरच काही शिकवून जात. आणि यात दररोज काही त्री शिकण्यासारखं असतं. तुम्ही आई-वडील झाल्यानंतर प्रत्येक वेळी काहीतरी शिकत असता. हे जरी थकवा अणणार  असलं तरी खुपचं समाधानकारक आहे. मी इतर आई काय काय करतात यासाठी खूप सारे व्हिडीओ बघून काढले आहेत. यातील काही गोष्टींचा फायदासुद्धा झाला. मात्र जेव्हा तुम्ही मातृत्वाच्या जगात पप्रवेश करता तेव्हा अपोआप नवीन गोष्टी शिकत जातं. माझा आणि अनमोलचा हा पहिलाचं अनुभव आहे आणि तो मी एन्जॉय करत आहे. मी माझ्या अनुभवांना सर्वांना पर्यंत पोहचविण्याच्या विचारात आहे. आणि त्यासाठीच वाट पाहत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: