जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रणबीरला सोडून आलिया भट्ट हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली परदेशी, वाचा काय म्हणाली नणंद रिद्धिमा

रणबीरला सोडून आलिया भट्ट हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली परदेशी, वाचा काय म्हणाली नणंद रिद्धिमा

रणबीरला सोडून आलिया भट्ट हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली परदेशी, वाचा काय म्हणाली नणंद रिद्धिमा

आलिया भट्ट (Alia Bhatt) ही बॉलिवूडमधील (Bollywood Actress) अशी अभिनेत्री आहे जिने फारच कमी वयात मोठं यश मिळविलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत या अभिनेत्रीने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहे. बॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आलिया आता हॉलिवूडमध्ये (Hollywood) नशीब आजमावणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मे-   आलिया भट्ट   (Alia Bhatt)  ही बॉलिवूडमधील   (Bollywood Actress)  अशी अभिनेत्री आहे जिने फारच कमी वयात मोठं यश मिळविलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत या अभिनेत्रीने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहे. बॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आलिया आता हॉलिवूडमध्ये  (Hollywood)  नशीब आजमावणार आहे. दरम्यान आलिया भट्ट तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटसाठी रवाना झाली आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावरुन याबाबत माहिती देत चाहत्यांकडून शुभेच्छा मागितल्या आहेत. आलिया भट्ट ही तरुणाईमध्ये फारच लोकप्रिय आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. आलिया भट्ट सध्या तिच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. रणबीर कपूरसोबतच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर ती हॉलिवूडला आपल्या डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना झाली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गॅल गॅडोटही दिसणार आहे. आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यामध्ये ती न्यूड मेकअपसह कॅज्युअल लुकमध्ये दिसत आहे. फोटोसोबतच तिने एक सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे, - ‘आज मी माझ्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात आहे. सध्या मला या क्षेत्रात मी पूर्णपणे नवीन असल्याचं जाणवत आहे. असं दिसतंय की, हे सर्व पुन्हा नव्याने सुरू होत आहे. मी याबद्दल खूप नर्व्हस आहे. म्हणून मला शुभेच्छा द्या’’. असं म्हणत आलियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

News18

अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट करत आहेत. आपल्या लेकीवर प्रेम व्यक्त करताना तिची आई सोनी राजदानने लिहिलंय - ‘ऑल द बेस्ट इन वर्ल्ड’. तर नणंद रिद्धिमानेही या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करत आशीर्वाद देणारा इमोजी शेअर करत लिहिलंय, ‘आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो’. अर्जुन कपूरने लिहिलंय- ‘आंतरराष्ट्रीय खेळाडू.’ याशिवाय मनीष मल्होत्रा, तसेच सावत्र बहीण पूजा भट्ट यांनी आलियाला खूप प्रेम आणि शुभेच्छा दिल्या आहेत.अलियाची ही पोस्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात