जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल' चक्क मुंबईच्या रस्त्यावर कचरा उचलताना दिसली अभिनेत्री

'गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल' चक्क मुंबईच्या रस्त्यावर कचरा उचलताना दिसली अभिनेत्री

'गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल' चक्क मुंबईच्या रस्त्यावर कचरा उचलताना दिसली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) व्हॅलेंटाईन स्पेशल केलेले एक (Valentine day) रील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 फेब्रुवारी- Adah Sharma Latest Reel: व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रत्येकाणे प्रम व्यक्त करणारे असतील किंवा प्रेम निर्माण करणारे मेसेस शेअर करत होते. मात्र बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) व्हॅलेंटाईन स्पेशल केलेले एक (Valentine day) रील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मुंबईच्या रस्त्यावार अदा चक्क रॅम्प वॉक करत कचरा उचलताना दिसली. मुंबईतील रस्त्यावरील प्रत्येक कचरापेटीसोबत अदा काहीशी रोमॅंटिक होत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. यासोबतच कचरा उचलताना ती विविध पोझ देताना दिसली. या व्हिडिओमध्ये अदाच्या (Adah Sharma Dutbin Reel) अदा पाहण्यालायक आहेत. अदाचा हा फनी व्हिडिओ शेअर करत तिनं इन्स्टावर म्हटलं आहे की, मुलांकडे जी आकर्षित होतात, अशा लोकांना आवडणाऱ्या व्यक्तीला हा व्हिडिओ टॅग करा.सेंन्स ऑफ ह्यूमर असणाऱ्यांना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटत आहे. अदा नेहमी तिच्या व्हिडिओ आणि फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. हटके कल्पना घेऊन ती व्हिडिओ करत असते आणि चाहत्यांचे मनोरंजन करत असते. वाचा- मन झालं बाजिंद’ फेम श्वेताने घेतली 11 लाखांची ‘ही’ कार, म्हणाली… विद्युत जामवालसोबत अदा कमांडो सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. तिनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर काहीजण मजेदार कमेंट करत आहेत कर काही तिला ट्रोल करत आहेत. अदा तिच्या अतरंगी स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असते. तिच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये अदा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. यासोबत तिचा या व्हिडिओतील लुक देखील चाहत्यांना आवडलेला आहे.

जाहिरात

अदा शर्माने हिंदी सिनेमासोबत तेलगू सिनेमात देखील काम केले आहे. कमांडो सिनेमासोबत ती हंसी तो फंसी व 1920 या सिनेमात देखील दिसली आहे. यासोबत ती काही वेब सिरीजमध्ये देखील दिसली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात