Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

संजय दत्तची मुलं प्लॅनिंग करून दुबईत शिफ्ट झाले नाहीत तर..; अभिनेत्याने सांगितलं खरं कारण

संजय दत्तची मुलं प्लॅनिंग करून दुबईत शिफ्ट झाले नाहीत तर..; अभिनेत्याने सांगितलं खरं कारण

संजय दत्तची शहरान आणि इक्रा ही जुळी मुलं 11 वर्षांची आहेत, ती गेल्या 2 वर्षांपासून दुबईत (Dubai) राहत आहेत.

संजय दत्तची शहरान आणि इक्रा ही जुळी मुलं 11 वर्षांची आहेत, ती गेल्या 2 वर्षांपासून दुबईत (Dubai) राहत आहेत.

संजय दत्तची शहरान आणि इक्रा ही जुळी मुलं 11 वर्षांची आहेत, ती गेल्या 2 वर्षांपासून दुबईत (Dubai) राहत आहेत.

 मुंबई, 14 मे-   अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) नुकतीच अभिनय क्षेत्रात पदार्पणाची 41 वर्षं पूर्ण केली आहेत. संजयच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले; पण तो सतत काम करत राहिला. तो सध्या अनेक प्रॉजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच संजय दत्तची महत्त्वाची भूमिका असलेला 'KGF: Chapter 2' चित्रपट रिलीज झाला असून, तो जबरदस्त हिट ठरला आहे. याशिवाय आगामी काळात त्याचे अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत. संजय त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान कुटुंबासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतो.

संजय दत्तची शहरान आणि इक्रा ही जुळी मुलं 11 वर्षांची आहेत, ती गेल्या 2 वर्षांपासून दुबईत (Dubai) राहत आहेत. अभिनेता आणि निर्माता संजय दत्त नेहमीच त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतो आणि कुटुंबासोबत फिरायला जातो. अलीकडेच टाइम्सशी बोलताना संजय म्हणाला, की 'मला आनंद आहे, की माझी मुलं तिथे शिकत आहेत. शिवाय माझी पत्नी मान्यताही तिथं तिचं काम करत आहे.’

संजय दत्त पुढे म्हणाला, 'इथे माझ्याकडे जेव्हा कामाची किंवा इतर प्रोफेशनल कमिटमेंट्स नसतात तेव्हा मी त्यांच्यासोबत दुबईमध्ये बराच वेळ घालवतो. मी तिथे जातो आणि त्यांना फिरायला घेऊन जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी (Summer Vacation) मी त्यांच्यासोबत असेन.’

2020 मधल्या पहिल्या लॉकडाउनच्या (Lockdown) आधीपासूनच संजय दत्तची मुलं दुबईत राहत आहेत. जेव्हा त्याला विचारलं गेलं, की प्लॅनिंग करून मुलांना दुबईला राहायला पाठवलं का, त्यावर संजय म्हणाला, की 'ती इथं राहू शकली असती; पण तिथे ते जास्त आनंदी आहेत, असं मला वाटतं. त्यांना तिथल्या शाळा (School) आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीज आवडतात. माझ्या पत्नीचा बिझनेस तिथेच सेटल झालाय. आम्ही सगळे फिल्म बिझनेससोबत (Film Business) इथेच मोठे झालो. त्यांना तिथे पाठवण्याचं कोणतंही प्लॅनिंग नव्हतं; पण ते घडून गेलं. मान्यताचा दुबईत स्वतःचा बिझनेस होता. त्यामुळे ती तिथे गेली. मुलंही तिच्यासोबत गेली.’

संजय म्हणाला, ‘मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवायला आवडतं. ती मुंबईत नसल्यानं बऱ्याचदा त्यांना भेटता येत नाही. त्यामुळे करमत नाही; पण माझी मुलं दुबईत खूश आहेत. त्यामुळे मीही खूश आहे. माझी मुलगी पियानो वाजवायला शिकत आहे, ती चांगली धावपटू (Runner) आणि जिम्नॅस्ट (Gymnast) आहे. माझा मुलगा ज्युनियर प्रोफेशनल फुटबॉल टीमसाठी (Junior Professional Football Team) खेळतो. त्या दोघांचा आनंद माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आहे.'

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Sanjay dutt