
बॉलिवूड सिनेमातील बोल्ड सीन्सची नेहमी चर्चा असते. सध्या बॉलिवूडच्या प्रत्येक शैलीमध्ये बदल होत आहे. यामध्ये काही कलाकार असे आहेत की त्यांनी ऑनस्क्रीन किस न करण्याचा नियम बनवला आहे.

या पॉलिसीमध्ये सलमान खान सर्वात पुढे आहे. 30 वर्षाच्या त्याच्या करिअरमध्ये सलमानने एकदाही किसिंग सीन केला नाही आहे. त्याला अनेकदा किसिंग सीन करण्याबाबत विचारण्यात आले, मात्र दरवेळी त्याने या गोष्टीस नकार दिला आहे.

अभिनेता तुषार कपूरने देखील अशा सिनेमात काम केले आहे, ज्यामध्ये अडल्ट सीन आहेत. मात्र त्याने ऑनस्क्रीन किसिंग सीन केला नाही आहे.




