आलिया भट्ट : ‘राझी’ हा अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. आलिया भट्टने या चित्रपटात सेहमत नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून आलियाने ती उत्तम अभिनेत्री आहे हे सिद्ध केले.
विकी कौशल : उरी: द सर्जिकल स्ट्राईक मधील ‘हाऊज द जोश’ हा डायलॉग कोणाला नाही आठवत. या चित्रपटातील भूमिकेसाठी विकी कौशलने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. पण त्यानंतर त्याने ‘सरदार उधम’ यांच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले होते.
सिद्धार्थ मल्होत्रा : गेल्या वर्षी याच काळात ‘शेरशहा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूडचा चॉकलेट बॉय सिद्धार्थ मल्होत्रा याने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका हुबेहूब निभावली होती.
कंगना रनौत : कंगना हि उत्कृष्ट अभिनेत्री आहे हे तर वेळोवेळी तिने सिद्ध केलेलं आहेच. पण तिच्या ‘मणिकर्णिका चित्रपटातील भूमिकेचे विशेष कौतुक झाले. झाशीच्या राणीची भूमिका योग्य साकारण्यासाठी तिने खास घोडेस्वारीचे आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले होते.
आमिर खान या अभिनेत्याच्या देशभक्तीवर सर्व स्तरातून संशय घेतला जात असताना मात्र त्याने पहिले क्रांतिकारक मंगल पांडे यांची साकारलेली भूमिका विसरता येण्यासारखी नाही.
परेश रावल यांनी १९९४ साली सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली होती. तिचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते.
‘लक्ष’ चित्रपटातील ह्रितिक रोशनने साकारलेली करण शेरगिलच्या भूमिकेने सर्वांचीच मन जिंकली होती.‘लक्ष’ चित्रपटातील ह्रितिक रोशनचा आजपर्यंतचा सर्वात उत्तम परफॉर्मन्स आहे.
अजय देवगण ताकदीचा अभिनेता आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळातच त्याने साकारलेल्या भगत सिंगच्या भूमिकेसाठी त्याने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता.
राजकुमार राव या अभिनेत्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचे कौतुक होते. त्याने ‘बोस- डेड ऑर अलाइव्ह’ या वेब सिरीजमध्ये साकारलेली सुभाषचंद्र बोस यांची भूमिका अजरामर ठरली आहे.