मुंबई, 15 जून- शाहरूख खानला कोणत्याची ओळखीची गरज नाही, देशचं नाही तर जगभरात किंग खानचे चाहते आहेत. शाहरूख खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. असं असताना त्याला ट्रोल करणारे देखील कमी नाहीत, अनेकदा ही मंडळी शाहरूखला कोणत्या कोणत्या कारणावरून ट्रोल करताना दिसते. पण शाहरूख नेहमी संयामानं घेतो. पण त्याचा सध्या एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरूख मला पाकिस्तानी असल्याचा अभिमान असल्याचं म्हणताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर आलं आहे. एका मुलाखतीमध्ये शाहरूख स्वतःच्या मुस्लीम असण्याबद्दल आणि धर्माबद्दल बोलत आहे. शिवाय या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये तो पाकिस्तानी असल्याचा गर्व असल्याचं सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरूनच त्याला ट्रोल देखील करायला सुरूवात झाली आहे. पण खरंच शाहरूख असा म्हणालाय का..यामगाचं सत्य समोर आलं आहे. शाहरूखचा हा व्हायरल व्हिडिओ एडिट करण्यात आल्याचं समोर आलं आहे. वाचा- देशमुखांनंतर केळकरांच्या घरावर हल्ला; वीणाचा भूतकाळ येणार समोर? शाहरूखचा हा व्हायरल व्हिडिओ 2010 साली झूम’ चॅनलला दिलेल्या मुलाखतीचा आहे. या मुलाखतीमध्ये शाहरुखला धर्मावरून भेदभाव सहन करावा लागला किंवा नाही? या प्रश्नाचे उत्तर देत आहे. शाहरूख या प्रश्नाला उत्तर देताना म्हणताना दिसत आहे की, माझा धर्म बाजूला ठेवून साऱ्या जगाने मला स्वीकारलं आहे. काही लोकांचा गैरसमज आहे की इस्लाम हा अल्पसंख्याक आहे. पण मला हा एक मार्मिक विनोदच वाटतो, कारण मला माझ्या धर्मामुळे काही वेगळं किंवा खास असं माझ्या बाबतीत काहीच घडलेलं नाही. आपण कोणत्याही धर्माचे असलो तरी त्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. मी जन्माने मुस्लीम आहे म्हणून माझा अल्लाहवर विश्वास आहे.
I'm proud to be a Pakistani. #ShahRukhKhan pic.twitter.com/cozYNde9n2
— Nᴀᴠ Kᴀɴᴅᴏʟᴀ ☬ (@SalmaniacNav) June 14, 2023
शाहरूख पुढे म्हणत आहे की, माझी पत्नी हिंदू आहे. तिने वाचलेली सर्व पुस्तके मी वाचली आहेत. ती जे करते त्याची मी पूजा करतो. आमची भाषा वेगळी असू शकते, पण आम्हा दोघांना जो संदेश पोहोचवायचा आहे, तो एकच आहे. लोक म्हणतात की काही देशांमध्ये माझी लोकप्रियता ही मी मुस्लीम असल्याने आहे. मला माझा मुस्लीम असल्याचा अभिमान आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे.
मला भारतीय असल्याचा अभिमान आहे..या शाहरूखच्या वाक्यातील शेवटचा भारतीय हा शब्द अगदी चपकलपणे काढून त्याऐवजी पाकिस्तानी हा शब्द जोडण्यात आला आहे. खूप बारकाईनं एडिटिंग स्कीलचा वापर करून हे जोडण्यात आल्याचं लक्षात येत आहे. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे अनेकांनी शाहरूखला ट्रोल देखील करण्यास सुरूवात केलं आहे.