मुंबई, 12 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor)साठी कबीर सिंह (Kabir Singh) हा सिनेमा मैलाचा दगड ठरला. ब्रेक लागलेलं शाहिदचं करिअर पुन्हा जोमात आलं. आता शाहिदचा जर्सी (Jersey) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कबीर सिंह या सिनेमामुळे प्रेक्षकांच्या मनात शाहिदची एक वेगळीच इमेज निर्माण झाली आहे. शाहिदचा इन्स्टा व्हिडीओ व्हायरल सिनेमाच्या गडबडीत असतानाच शाहिदचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्याने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद मस्तीच्या मूडमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तो वेगवेगळे, वाकडेतिकडे चेहरे करत आहे. त्याचे हे वाकडे-तिकडे चेहरे पाहून नेटकऱ्यांनीही शाहिदसोबत मस्करी केली आहे. “भाई असे व्हिडीओ पोस्ट करू नकोस नाहीतर NCB घरी येईल”. अशी कॉमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajpoot)च्या निधनानंतर सुरू झालेल्या तपासामध्ये ड्रग कनेक्शन समोर आलं आहे. याप्रकरणी अनेक बड्या अभिनेत्रींची चौकशीही झाली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या ड्रग कनेक्शनचा मामला चांगलाच तापलेला आहे. असं असाताना शाहिदने हा व्हिडीओ शेअर करुन नेटकऱ्यांच्या हाती आयतीच संधी दिली. शाहिदने दाखवली माणूसकी शाहिद कपूरने फिल्म जर्सीसाठी अत्यंत कमी मानधन घेतल्याचीही चर्चा आहे. कोरोनामुळे निर्मात्यांना शूटिंगचं शेड्युल पुढे ढकलावं लागलं. तसंच आर्थिक फटकाही सहन करावा लागला. त्यामुळे निर्मात्यांनी केलेल्या विनंतीला मान देत शाहिदने या फिल्मसाठी अत्यंत कमी मानधन घेतलं आहे. शाहीदने त्याच्या नेहमीच्या मानधनापेक्षा तब्बल 8 कोटी कमी घेतले आहेत.