• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘ते क्षण पुन्हा अनुभवायचे आहेत...’; वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख झाला भावुक

‘ते क्षण पुन्हा अनुभवायचे आहेत...’; वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख झाला भावुक

आज महाराष्ट्राचे(Maharashtra) माजी मुख्यमंत्री (CM) स्वर्गीय विलासराव देशमुख (Late Vilasrao Deshmukh) यांचा वाढदिवस आहे.

 • Share this:
  मुंबई, 26 मे-  आज महाराष्ट्राचे(Maharashtra) माजी मुख्यमंत्री (CM) स्वर्गीय विलासराव देशमुख (Late Vilasrao Deshmukh) यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आज अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आपल्या वडिलांच्या आठवणीतगुंतला आहे. आणि वडिलांसोबतचे क्षण परत यावेत अशी इच्छा व्यक्त करत आहे. रितेशने ट्वीट करत आपल्या वडिलांसोबतच्या खास क्षणांना उजाळा दिला आहे. अभिनेता रितेश देशमुख आपल्या वडिलांच्या किती जवळ होता, सर्वांचं माहिती आहे. त्यांच्या अचानक निघून जाण्यानं रितेश आणि त्याच्या कुटुंबात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा रितेश वडिलांना तितक्याच आत्मीयतेनं आठवतो. बऱ्याच वेळा रितेश आपल्या वडिलांच्या आठवणीत गुंतलेला दिसतो. आज स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा वाढदिवस आहे. या खास दिवशी रितेशला आपल्या वडिलांची प्रकर्षाने आठवण होत आहे. रितेशने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर आपल्या वडिलांसोबत बालपणीचा फोटो शेयर करत आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच ती वेळ परत यावी अशी भावनादेखील व्यक्त केली आहे. तसेच आपल्यलाला वडिलांची रोजचं आठवण येत असल्याचं म्हटलं आहे. (हे वाचा:VIDEO:‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये स्वीटू ओमला लंडनला जाण्यापासून थांबवणार का?) रितेशच्या या ट्वीट नंतर अनेक राजकीय व्यक्तींनी तसेच कलाकारांनी कमेंट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (हे वाचा: चित्रपटांना रामराम करत 'या' अभिनेत्रीनं धरली गावाची वाट, कोकणात फुलवली शेती) तसेच अभिनेत्री जेनेलिया देशमुखने सुद्धा आपल्या लग्नातील फोटो शेयर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आणि मुली आणि वडिलांच्या नात्याला उजाळा दिला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: