जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भररस्त्यात चोपला पाहिजे’, रितेश देशमुखला राग अनावर

‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भररस्त्यात चोपला पाहिजे’, रितेश देशमुखला राग अनावर

‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भररस्त्यात चोपला पाहिजे’, रितेश देशमुखला राग अनावर

(riteish Deshmukh) रितेशने ट्वीट (Tweet) करत ‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’ असं म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 मे : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आलेली आहे. याचे भयानक परिणाम समोर येत आहेत. कोरोनाने गेल्यावर्षीपेक्षाही जास्त थैमान यावर्षी घातलं आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कोरोनामुळे देशाची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांना मदतीची गरज पडत आहे. सध्या ऑक्सिजन, बेड यांचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे लोक पुरता घाबरून गेले आहेत. तर दुसरीकडे कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या ‘रेमडेसिविर’ (Remdesivir) इंजेक्शनच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतं असल्याच्या घटना समोर येत आहेत. हे सर्व पाहून अभिनेता रितेश देशमुखचा(Riteish Deshmukh) राग अनावर झाला आहे. रितेशने ट्वीट (Tweet) करत ‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’ असं म्हटलं आहे.

जाहिरात

देशातील प्रत्येक व्यक्ती आज कोरोना महामारीशी लढा देत आहे. आज प्रत्येक व्यक्तीला एकमेकांच्या मदतीची गरज भासत आहे. एकीकडे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं आहे. तर दुसरीकडे मृतांचा आकडासुद्धा वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे बाधितांचा वेग इतका वाढला आहे. की आत्ता रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. त्या बाजूसावरत असतानाचं आणखी एक गंभीर प्रश्न समोर उभा राहिला आहे. तो म्हणजे औषधांचा होतं असलेलां काळाबाजार. (हे वाचा: ‘ते सगळं ठिकाय पण याचा मास्क कुठाय’, रक्तदान करायला गेलेला सोनू निगम होतोय ट्रोल   ) ही सर्व परिस्थिती पाहून मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख संतापला आहे. नेहमीप्रमाणेचं आपलं मत व्यक्त करत रितेशने म्हटलं आहे, ‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’. रितेशचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात रिट्वीट करण्यात आलं आहे. रितेशने नेहमीचं सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात