मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सौरभ गांगुलीवर बनणार बायोपिक; रणबीर कपूर साकारणार दादाची भूमिका?

सौरभ गांगुलीवर बनणार बायोपिक; रणबीर कपूर साकारणार दादाची भूमिका?

आगामी काळात कपिल देव, मिताली राज यांच्यादेखील बायोपिक पाहायला मिळणार आहेत.

आगामी काळात कपिल देव, मिताली राज यांच्यादेखील बायोपिक पाहायला मिळणार आहेत.

आगामी काळात कपिल देव, मिताली राज यांच्यादेखील बायोपिक पाहायला मिळणार आहेत.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 13 जुलै- बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या बायोपिकची मोठी चलती आहे. त्यातल्या त्यात क्रिकेटर्सच्या आयुष्यावर अनेक बायोपिक तयार होतं आहेत. महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्या बायोपिकच्या प्रचंड यशानंतर आत्ता अनेक क्रिकेटर्सच्या आयुष्यावर आधारित बयोपिक येत आहेत. त्यामध्ये कपिल देव, मिताली राज यांचा समावेश आहे. यामध्ये आत्ता क्रिकेटर सौरभ गांगुलीचासुद्धा (Saurabh Ganguli) समावेश झाला आहे. लवकरच दादाच्या आयुष्यावर बायोपिक तयार होणार आहे. तसेच चर्चा आहे की यामध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दादाच्या भूमिकेत दिसणार आहे.

क्रिकेटर सौरभ गांगुलीवर आधारित बायोपिकला आत्ता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. हा चित्रपट Viacom बेनरखाली तयार केला जाणार आहे. यामध्ये कोणता अभिनेता सौरभची भूमिका साकारणार आहे, याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. मात्र माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये अभिनेता रणबीर कपूर सौरभच्या भूमिकेत दिसू शकतो. एका मुलाखती दरम्यान सौरभने म्हटलं होतं की त्याला हृतिक रोशन खूप आवडतो. तेव्हा पासून असा अंदाज बांधण्यात येत होता, की हृतिक दादाच्या भूमिकेत दिसून येईल.

(हे वाचा:'अभी तो पारी बाकी थी' म्हणत यशपाल शर्मांची भूमिका साकारणारा अभिनेता झाला भावुक  )

सौरभ गांगुलीने News 18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, ‘माझ्याकडून बायोपिकसाठी मी ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र अजून दिग्दर्शकाचं नाव सांगण शक्य नाहीय. अजून खूप गोष्टी आहेत. त्यासर्व ठीक झाल्यानंतर या गोष्टी सांगितल्या जातील. त्याच्यासाठी अजून काही दिवस लागतील. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटासाठी स्क्रिप्टसुद्धा लिहिण्यात येत आहे. सौरभची प्रोडक्शन हाउससोबत अनेक मिटिंगदेखील झाल्या आहेत. अभिनेत्याचं नावदेखील जवळजवळ निश्चितचं झालं आहे. यामध्ये रणबीर कपूर सर्वात वर आहे. या लिस्टमध्ये आणखी दोन अभिनेत्यांचं नावदेखील आहे.

First published:

Tags: Ranbir kapoor, Saurav ganguli