'रामायण' फेम 'सुमंत' काळाच्या पडद्याआड; अभिनेता चंद्रशेखर वैद्य यांचं निधन

'रामायण' फेम 'सुमंत' काळाच्या पडद्याआड; अभिनेता चंद्रशेखर वैद्य यांचं निधन

1953 मध्ये व्ही.शांताराम यांच्या ‘सुरंग’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

  • Share this:

मुंबई, 16 जून- हिंदी चित्रपटसृष्टीतील(Film Industry) दिग्गज अभिनेता(Actor) चंद्रशेखर वैद्य(Chandrashekhar Vaidya Death) यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जातं आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी मुंबईतील अंधेरीच्या आपल्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांना आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या कुटुंबांसोबत राहायचं होतं. आणि त्यांची ही इच्छा पूर्णदेखील झाली.

50 च्या दशकामध्ये सहाय्य कलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात करणाऱ्या चंद्र्शेखर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपटांत मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे. 1953 मध्ये व्ही.शांताराम यांच्या ‘सुरंग’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी कवी, मस्ताना, काली टोपी, लाल रुमाल, स्ट्रीट सिंगरसारख्या अनेक चित्रपटात ते मुख्य अभिनेता म्हणून झळकले होते. त्यानंतर त्यांनी शराबी, शक्ती, डिस्को डान्सर, नमक हलाल सारख्या चित्रपटांत सहायक अभिनेता म्हणून काम केलं आहे. अजून सांगायचं झालं तर, छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘रामायण’ मध्ये ते ‘सुमंत’च्या भूमिकेत दिसून आले होते. यामध्ये ते सर्वात ज्येष्ठ कलाकार होते.

(हे वाचा:त्या' डायलॉगामुळे अडकले मिथुन; वाढदिवसादिवशीच होतेय पोलीस चौकशी   )

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या नातु विशाल शेखरने म्हटलं की, ‘त्यांना अनेक दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांना जुहूच्या क्रिटी केयर रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र ताप कमी आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना ही वेळ आपल्या कुटुंबांसोबत घालवायची होती. त्यामुळे घरीच त्यांच्यासाठी सर्व नर्सिंग व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आज झोपेतच आजोबां आम्हाला सोडून गेले. ते 98 वर्षांचे होते’. त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Published by: Aiman Desai
First published: June 16, 2021, 1:13 PM IST

ताज्या बातम्या