मुंबई, 16 जून- अभिनेता (Actor) मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty)यांना आपल्या पहिल्याचं चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मिथुन चक्रवर्ती हे उत्तम अभिनेता आणि उत्तम डान्सर म्हणून लोकप्रिय आहेत, अलीकडेच त्यांनी राजकारणातसुद्धा प्रवेश केला आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या लव्हस्टोरीचीसुद्धा मोठी चर्चा झाली होती. त्यांचं नाव दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. पाहूया नेमकं काय घडलं होतं.
मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी ज्यावेळी ‘जाग उठा इंसान’ या चित्रपटामध्ये एकत्र काम करत होते. आणि दरम्यानचं ते एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र मिथुन चक्रवर्ती यांचं आधीच लग्न झालं होतं. अभिनेत्री योगिता बाली या त्यांच्या पत्नी होत्या. मिथुन आणि श्रीदेवी यांनी सर्वांनासमोर आपल्या नात्याचा कधीही खुलासा केला नव्हता. मात्र त्याकाळी त्यांच्या अफेयरच्या चर्चांनी खुपचं जोर धरला होता. एकवेळ अशी आली होती, की त्यावेळी म्हटलं जाऊ लागलं की मिथुन आणि श्रीदेवी यांनी गुपचूप लग्न केलं आहे. असं म्हटलं जात की लग्नाची गोष्ट समजताचं त्यांच्या पत्नी योगिता बाली यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे मिथुन यांनी श्रीदेवीसोबत आपले सगळे संबंध संपवले.
(हे वाचा: HBD: 'त्या' गाण्यासाठी चक्क गर्लफ्रेंडशी केलं ब्रेकअप; अमाल मलिकचा अतरंगी किस्सा )
मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाली चित्रपट ‘मृगया’ मधून आपल्या करीयरची सुरुवात केली होती. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना आपल्या या पाहिल्याचं चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या करीयरमध्ये तब्बल तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. सन 1982 मध्ये आलेला चित्रपट ‘डिस्को डान्सर’ ने त्यांना एक नवी ओळख दिली होती. या चित्रपटामुळे ते विशेष चर्चेत आले होते. त्यांनी 350 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी बंगाली, ओडीसा, भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये अभिनय केला आहे. अशा या अष्टपैलू अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mithun chakraborty