मुंबई, 5 जून- अभिनेता(Actor) मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या ‘द फॅमिली मॅन 2’(The Family Man 2) मुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या वेबसिरीजबद्दल अनेक विवाद समोर येत होते. इतकचं नव्हे तर सोशल मीडियावरून या वेबसिरीजवर बंदी आणण्याची मागणीदेखील होत होती. मात्र रिलीजनंतर अभिनेता मनोज वाजपेयीच्या अभिनयाचं खुपचं कौतुक होत आहे. आगामी काळामध्ये या अभिनेत्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. अलीकडेच अशी चर्चा सुरु होती की, मनोज वाजपेयी अभिनेता हृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. मात्र आत्ता मनोज वाजपेयीने या वेबसिरीजमधून काढता पाय घेतला आहे.
टॉम हिडलेस्टन यांच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेबसिरीज साठी मेकर्सनी मनोज वाजपेयी यांना विचारणा केली होती. शस्त्रांची डील करणाऱ्या रिचर्ड रोपरची ही भूमिका होती. ‘द नाईट मॅनेजर’ मध्ये ही भूमिका ह्युग लॉरीने साकारली होती. तसेच टॉम हिडलेस्टनने यामध्ये जोनाथन पाइन ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘द नाईट मॅनेजर’ च्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता हृतिक रोशन झळकणार आहे. आणि या वेबसिरीजसाठीचं अभिनेता मनोज वाजपेयीला विचारणा करण्यात आली होती. (हे वाचा: सलमान खान करतोय ‘Radhe’चा सिक्वल; पण, चाहत्यांसमोर ठेवली ही अट ) मात्र अभिनेता मनोज वाजपेयीने ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नकार दिला आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार मनोज यांच्याजवळ डेट उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांनी या वेबसिरीजसाठी नकार कळवला आहे. आणि म्हणूनच हृतिक रोशनच्या या डेब्यू वेबसिरीजमध्ये ते दिसणार नाहीत. (हे वाचा: सलमानच्या या अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न? पाहा ती सध्या काय करते ) तसेच मिड डे कडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना महामारीमुळे त्यांच्या 2 वेबसिरीजनां आधीच विलंब झाला आहे. आणि ते सध्या उत्तराखंडमध्ये एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहेत. आणि त्यानंतर ते आपली विलंब झालेली कामे आटोपून घेणार आहेत. आणि अशातच त्यांना या वेबसिरीजसाठी मेकर्सला हव्या असणाऱ्या डेट देणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी यामधून काढता पाय घेतला आहे.