जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमान खान करतोय ‘Radhe’चा सिक्वल; पण, चाहत्यांसमोर ठेवली ही अट

सलमान खान करतोय ‘Radhe’चा सिक्वल; पण, चाहत्यांसमोर ठेवली ही अट

सलमान खान करतोय ‘Radhe’चा सिक्वल; पण, चाहत्यांसमोर ठेवली ही अट

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर सलमान खान करतोय राधेच्या सिक्वलची तयारी; पण चाहत्यांसमोर ठेवली ही एक विचित्र अट

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 5 जून**:** सलमान खानचा (Salman Khan) राधे (Radhe) हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला. सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटातील अॅक्शन सीन्स पाहून कौतुकाचा वर्षाव केला तर दुसरीकडे टीकाकारांनी मात्र भाईजानला जोरदार ट्रोल केलं. शिवाय ऑनलाईन प्रदर्शित झाल्यामुळं सलमानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत राधेला आर्थिक यश देखील थोडं कमीच मिळालं. मात्र तरी देखील भाईजाननं हार मानलेली नाही. आता सलमान राधेचा सिक्वल घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Salman Khan will make a sequel to Radhe) राधे चित्रपटाच्या निमित्तानं बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत सलमानने ही मोठी घोषणा केली. या चित्रपटाचा सिक्वेल यावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे ही इच्छा व्यक्त केली. त्यामुळं प्रेक्षकांच्या आग्रहाखातर माझी टीम सिक्वेलचा विचार करत आहे. जर राधेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही त्याचा सिक्वल घेऊन नक्कीच येऊ. नागिन फेम पर्ल व्ही पुरीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक तो म्हणाला, “राधे हा वॉण्टेडचा सिक्वल नाही. वॉण्टेडमधील व्यक्तिरेखा घेऊन त्याच्यावर एक वेगळाच चित्रपट आम्ही तयार केला आहे. पण दोन्ही चित्रपटातील स्टाईल किंवा अॅक्शन सीन एकसारखे वाटत असल्यामुळं प्रेक्षकांना हा गैरसमज झाला. आम्ही सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलचा विचार करत आहोत. ज्या प्रमाणे चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा दबंग चित्रपट सीरिजमधून विस्तारली गेली. त्या प्रमाणे राधेला देखील आणखी विस्तारता येऊ शकतं का? याबद्दल आमची क्रिएटिव्ह टीम विचार करत आहे.” फक्त 18 पाहूणे होते हजर; असा पार पडला यामी-आदित्यचा लग्नसोहळा 13 मे ला ईदच्या मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. भारतात तो zee5 च्या झी प्लेक्स (zee plex) वर प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्याच दिवशी अनेकांनी एकाच वेळी zee5 लॉगीन केल्याने  zee5 चा सर्वर क्रॅश झाल्याचं पाहायाला मिळालं. त्यामुळे प्रेक्षकांनी उंदड प्रतिसाद दिल्याचं समजतं आहे. तर भारताबाहेर दुबई, ऑस्ट्रेलिया या देशातंही चित्रपट पाहिला गेला. युएईच्या (UAE) फर्स्ट ग्लोबल प्रिमियरमध्ये राधेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. समोर आलेल्या माहितीनुसार राधेने पहिल्याच दिवशी ओव्हरसिजमध्ये 2.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारताबाहेर राधेला मिळत असलेला प्रतिसाद उत्तम मानला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात