जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / चॅलेंज! ओळखा पाहू कोण आहे फोटोतील हँडसम सेलिब्रेटी? हॉलिवूड अभिनेत्यांसोबत व्हायची तुलना

चॅलेंज! ओळखा पाहू कोण आहे फोटोतील हँडसम सेलिब्रेटी? हॉलिवूड अभिनेत्यांसोबत व्हायची तुलना

ओळखा पाहू कोण आहे फोटोतील सेलिब्रेटी?

ओळखा पाहू कोण आहे फोटोतील सेलिब्रेटी?

Guess the Bollywood’s Most Handsome Actor: सोशल मीडियावर नेहमीच सेलिब्रेटींचे थ्रोबॅक फोटो व्हायरल होत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याच्या तरुणपणाचा फोटो दाखवणार आहोत जो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल हा तरुण नेमका आहे तरी कोण?

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 मे- बॉलिवूड कलाकारांचा चाहतावर्ग अफाट असतो. या चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराबाबत लहान-मोठ्या गोष्टी जाणून घ्यायला प्रचंड आवडतात. तर अनेकांना कलाकारांच्या बालपणीच्या आणि तरुणपणीच्या फोटोंमध्ये रस असतो. आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री पूर्वी कसे दिसायचे हे पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियावर नेहमीच सेलिब्रेटींचे थ्रोबॅक फोटो व्हायरल होत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याच्या तरुणपणाचा फोटो दाखवणार आहोत जो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल हा तरुण नेमका आहे तरी कोण? या फोटोमध्ये दिसणार्‍या तरुणाकडे पाहून तुम्हाला वाटले असेल की, तो एखादा सर्वसामान्य मुलगा असेल. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या तरुणाची गणना जगातील सर्वात सुंदर कलाकारांमध्ये करण्यात आली आहे. वाटलं ना आश्चर्य? पण हे खरं आहे. या फोटोवरुन अजिबात काही ठरवू नका, कारण या मुलाचे तरुणपणीचे फोटो पाहिल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. या मुलाने देशातीलच नव्हे विदेशातील तरुणींनासुद्धा भुरळ घातली आहे. हा मुलगा हिंदी सिनेसृष्टीला एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी मुली तासंतास स्टुडिओबाहेर रांगा लावून उभ्या असत. हा तरुण दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा ‘ही मॅन’ धर्मेंद्र आहे. हा धर्मेंद्र यांच्या अगदी तरुण वयातील फोटो आहे. (हे वाचा: सनी देओलचा मुलगा बांधणार लग्नगाठ, गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे अभिनेत्याची होणारी सून? ) बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935  रोजी पंजाबमध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव धरम सिंग देओल असं आहे. त्यांच्या वडिलांचे नाव केवल किशन सिंग देओल आणि आईचे नाव सतवंत कौर आहे. धर्मेंद्र यांनी सुरुवातीचे शिक्षण पंजाबमधूनच घेतले होते. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं. 60 च्या दशकात धर्मेंद्र यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या मनोरंजनसृष्टीत त्यांनी आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

News18

धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात साकारलेल्या बऱ्यापैकी भूमिका रोमँटिक होत्या. चित्रपटांमधील त्यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना भुरळ घालायचा. यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचं देखणं रुप होय. धर्मेंद्र यांना तारुण्यात बॉलिवूडचा सर्वात देखणा अभिनेता म्हटलं जायचं. जगातील सर्वात देखण्या अभिनेत्यांच्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश होता. तारुण्याच्या दिवसात धर्मेंद्र इतके आकर्षक दिसत होते की, मुली त्यांना पाहण्यासाठी तासनतास वाट पाहात असत.

News18लोकमत
News18लोकमत

एकेकाळी धर्मेंद्र यांची तुलना प्रसिद्ध हॉलिवूड स्टार जेम्स डीन आणि पॉल न्यूमन यांच्याशी केली जात होती. रोमँटिक भूमिकानंतर धर्मेंद्र यांनी ऍक्शन चित्रपट करण्यास सुरुवात केली होती. आणि इथूनच त्यांना ‘ही मॅन’ म्हणून ओळख मिळाली होती. लाखो तरुणी आणि अनेक अभिनेत्री फिदा असलेल्या विवाहित धर्मेंद्र यांचं मन ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यावर आलं होतं. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत दुसरं लग्न केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात