Home /News /entertainment /

आमिर खानची बहीण निखत करणार TV डेब्यू, 'या' मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

आमिर खानची बहीण निखत करणार TV डेब्यू, 'या' मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

Aamir Khan 57th birthday

Aamir Khan 57th birthday

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता मि. परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan) आत्तापर्यंत आपली जिद्द आणि अभिनय कौशल्याने कोट्यावधी लोकांचं मन जिंकलं आहे. आमिर खानचं अभिनय कौशल्य तुम्ही पाहिलंच आहे. आमिरचा भाऊ फैसल खानही त्याच्यासोबत 'मेला' सारख्या चित्रपटात काम करताना दिसला आहे. या दोन्ही भावांनंतर आता त्यांची मोठी बहीण (Aamir Khan & Faisal Khan Sister) निखत खानही (Nikhat Khan) अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 मे-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता मि. परफेक्शनिस्ट आमिर खानने   (Aamir Khan)  आत्तापर्यंत आपली जिद्द आणि अभिनय कौशल्याने कोट्यावधी लोकांचं मन जिंकलं आहे. आमिर खानचं अभिनय कौशल्य तुम्ही पाहिलंच आहे. आमिरचा भाऊ फैसल खानही त्याच्यासोबत 'मेला' सारख्या चित्रपटात काम करताना दिसला आहे. या दोन्ही भावांनंतर आता त्यांची मोठी बहीण  (Aamir Khan & Faisal Khan Sister)  निखत खानही   (Nikhat Khan)  अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. टीव्हीवर पदार्पण करत निखत पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात एन्ट्री करणार आहे. याआधी त्यांनी काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण त्यातून त्यांना तितकसं आपलं अभिनय दाखविता आलेलं नाहीय. पण या टीव्ही मालिकेतील भूमिका फारच खास असणार आहे. लवकरच आमिर खानची बहीण निखत खान स्टार प्लसच्या 'बन्नी चाऊ होम डिलिव्हरी' शोमधून पहिल्यांदाच टीव्हीवर पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार निखत या शोमध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.त्यांच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांना शोमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळणार आहेत. आमिर आणि फैसलनंतर आता बहीण निखतला पडदयावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. निखतने नुकतंच या शोबाबत मीडियाशी संवाद साधला. निखत आपल्या नव्या इनिंगबद्दल खूपच उत्सुक आहे. शोमधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं, 'स्टार प्लस शो 'बनी चाऊ होम डिलिव्हरी' मधील माझ्या भूमिकेबद्दल मी खूप उत्सुक आहे. याआधी मी मोठ्या पडद्यावर अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण टीव्ही शोच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच माझ्या प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. (हे वाचा: ठरलं! पायल रोहतगी-संग्राम सिंह लवकरच बांधणार लग्नगाठ, यादिवशी करणार डेस्टिनेशन वेडिंग) या मालिकेत 'बनी' ही मुख्य भूमिका अभिनेत्री उल्का गुप्ता साकारणार आहे. हा शो 'बनी' नावाच्या एका मुलीबद्दल आहे. जी घरी बनवलेल्या खाद्यपदार्थांच्या डिलिव्हरी संबंधित व्यवसाय चालवते. ती खूप आत्मविश्वासी आहे. तिची व्यक्तिरेखा नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. हा शो स्टार प्लसवर 30  मे पासून प्रसारित होणार आहे.महत्वाचं म्हणजे 'दिया और बाती' या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्यांनीच या नव्या मालिकेची निर्मिती केली आहे. 'दिया और बाती' सारखीच या मालिकेलासुद्धा लोकप्रियता मिळते का? ही मालिकासुद्धा तितकीच लोकप्रिय ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Aamir khan, Entertainment, Tv shows

    पुढील बातम्या