जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मि. परफेक्शनिस्टचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं! आमिर खान आणि किरण राव यांनी घेतला तलाक

मि. परफेक्शनिस्टचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं! आमिर खान आणि किरण राव यांनी घेतला तलाक

मि. परफेक्शनिस्टचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं! आमिर खान आणि किरण राव यांनी घेतला तलाक

Aamir Khan and Kiran Rao Divorced: किरणच्या आधी आमिर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 03 जुलै: अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी (Aamir Khan and Kiran Rao Divorced) एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी घटस्फोटाविषयी अधिकृत स्टेटमेंटही जारी केलं आहे. आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट (Joint Statement issued by Aamir Khan and Kiran Rao) जारी करत त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली आहे. आमिर-किरणचा 15 वर्षांचा संसार मोडल्याने चाहत्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, ’ या 15 वर्षा सुंदर वर्षात आम्ही एकत्र जीवनभरातील अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं  आहे आणि आमचं नातं केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळं वृद्धिंगत झालं आहे. आम्हाला आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे- आता नवरा बायको म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचं कुटुंब म्हणून'.

    जाहिरात

    जारी केलेल्या जॉइंट स्टेटमेंटमध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी असं पुढे असं म्हटलं आहे की, ‘आम्ही काही काळापासून विभक्त होण्याची योजना आखत होतो. वेगळे राहणार असलो तरी आम्ही आमचं आयुष्य एक विस्तारीत कुटुंब म्हणून शेअर करू. आम्ही आमचा मुलगा आझाद यासाठी एक समर्पित पालक आहोत ज्याचं पालन-पोषण आम्ही एकत्र करू. आम्ही चित्रपट, पानी फाउंडेशन आणि ज्याबद्दल आम्ही भावुक आहोत अशा प्रकल्पांसाठी सहकारी म्हणून काम करत राहू’. किरणच्या आधी आमिर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण राव आणि आमिर खान यांचं लग्न झालं. केवळ एका फोनच्या संभाषणानंतर आमिर खान आणि किरण राव मनाने एकमेकांच्या जवळ आले होते. एका मुलाखतीमध्ये आमिरने सांगितलं होतं की, “2001 साली तो ‘लगान’ फिल्मचं काम करत होता. त्यावेळी किरण राव या फिल्मची असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. त्यावेळी आमची एकमेकांशी फक्त ओळख झाली होती. माझ्या घटस्फोटानंतर एकदा मी आणि किरण अर्धा तास फोनवर बोलत होतो. फोन ठेवल्यानंतर मला तिच्याशी आणखी बोलावसं वाटत होतं. या फोन कॉलनंतर आम्ही एकमेंकांना भेटायला लागलो. आणि त्यानंतर दीड वर्षांनी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात