मुंबई 11 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळं नेहमीच चर्चेत असते. “माझ्या वडिलांना आयर्नमॅन म्हणतात.”, “माझ्या वडिलांना कधीही कॉफी विथ करण या शोमध्ये बोलावलं गेलं नाही.”, “चित्रपटात काम मिळवण्यासाठी मी प्रचंड स्ट्रगल केलं आहे.” अशा प्रकारच्या विधानांमुळं तिला अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. परंतु खरं सांगायचं झालं तर सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीपासून तिच्यावर टीका होत आहे. (Ananya Panday troll) तिला लोक फ्लॅटस्क्रीन म्हणून चिडवायचे. असा अनुभव तिनं सांगितला आहे. (people called Ananya Panday flat screen)
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अनन्यानं बॉडी शेमिंगचा अनुभव सांगितला. “चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी मी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. कुटुंबीयांसोबत मी पिकनिकला गेले होते त्यावेळचे ते फोटो होते. मात्र फोटो पाहून नेटकऱ्यांनी माझी खिल्ली उडवली. मी मुलांसारखी दिसते. तू तर फ्लॅटस्क्रीन आहेस अशा कॉमेंट करुन लोक माझी खिल्ली उडवत होते. अशा प्रकारच्या कॉमेंटमुळं मी नैराश्येत देखील गेले होते. स्वत:वरचा विश्वास हळूहळू कमी झाला होता. पण पालकांनी मला या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढलं. अन् आता माझ्यावर या ट्रोलिंगचा काहीही परिणाम होत नाही.” असा अनुभव या मुलाखतीत अनन्यानं सांगितला.
अवश्य पाहा - दीपिका पदुकोण आणि रणवीरचा हटके डान्स; VIDEO प्रचंड व्हायरल
अनन्या ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे. स्टुडंट ऑफ द ईयर 2 या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं पती पत्नी और वो, अंग्रेजी मिडियम, खाली पिली या चित्रपटांमध्ये काम केलं. अनन्याच्या अभिनयावर अनेकदा टिका केली जाते. वडिलांमुळं तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असं अनेकदा म्हटलं जातं. या टीकेवर प्रत्तुत्तर देताने तिनं हा बॉडिशेमिंगचा अनुभव सांगितला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ananya panday, Bollywood actress, Entertainment, Film star, Trollers