मुंबई, 16 ऑगस्ट : उर्फी जावेद (Urfi javed) म्हटलं तरी पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे फॅशन. निरनिराळ्या फॅशन सेन्सनं उर्फी नेहमीच चर्चेत असते. नुकतंच उर्फीनं तिला येणाऱ्या धमक्यांविषयी पोस्ट शेअर केली होती. उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा फोटो शेअर केला होता. याशिवाय उर्फीनं काही व्हॉट्सअॅप चॅटही शेअर केल्या होत्या. अशातच आता उर्फीनं याविषयी आणखी स्टोरी शेअर केली आहे. दोन वर्षांपासून येणाऱ्या धमक्यांविषयी कुठलीही कारवाई मुंबई पोलीसांनी केली नसल्याची खंत उर्फीनं व्यक्त केली होती. एक व्यक्ती तिला व्हिडीओ सेक्स करण्यासाठी धमकी देत असल्याचंही उर्फीनं पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. या पोस्टमध्ये उर्फीनं मुंबई पोलीसांना टॅग केलं होतं. आता मुंबई पोलिसांनी या व्यक्तीवर कारवाई केली आहे. आज उर्फीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. ‘गुड न्यूज! माझा विनयभंग करणारा हा माणूस अखेर तुरुंगात आहे. मुंबई पोलिसांचे खूप खूप आभार’, असं म्हणत उर्फीनं पोस्ट शेअर केली आहे.
उर्फीनं पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, ‘हा व्यक्ती मला गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या देत आहे. दोन वर्षापूर्वीही माझे फोटो मॉर्फ करुन कोणीतरी व्हायरल केले होते. याबाबत मी 2 वर्षांपूर्वीच पोलिसांत तक्रार केली होती. पोस्ट शेअरही केली होती पण अद्याप त्याविषयी कोणतीही कारवाई झालेली नाही. आता हा व्यक्ती मला सतत ब्लॅकमेल करत आहे, तो मला व्हिडिओ सेक्स करण्यास सांगत आहे. मी असं केलं नाही तर माझे करिअर बरबाद करेल आणि फोटो वेगवेगळ्या बॉलिवूड पेजेसवर शेअर करेल, असं सांगत आहे’. हेही वाचा - Prasad-Manjiri Oak: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी पुन्हा चर्चेत, नव्या फोटोंनी वेधलं लक्ष ‘मी या सगळ्या प्रकाराविषयी 14 दिवसांपूर्वी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. याविषयी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. मी मुंबई पोलिसांबद्दल बरंच ऐकलं आहे, परंतु या प्रकरणाबद्दल त्यांच्या वृत्तीचे मला आश्चर्य वाटते. धमकी देणारा हा व्यक्ती पंजाब फिल्म इंडस्ट्रीमधला आहे. मुक्तपणे फिरणारी ही व्यक्ती समाजासाठी घातक ठरू शकते’, असं उर्फीनं म्हटलं. सोमवारी पंजाब इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या ओबेद आफ्रिदीने एका मुलाखतीत अभिनेत्रीचे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले होते. ओबेद म्हणाला, ‘मला उर्फीशी वाद घालायचा नाही कारण त्याच्याकडे मेंदू नाही. मी त्याच्यासोबत काम केले आहे आणि आमच्यात पैशांवरून तणाव सुरू होता. इतकेच नाही तर ओबेदने ‘ही चॅट फेक आहे, त्यात ना माझे नाव दिसत आहे, ना माझे नाव’ असे म्हटलं होतं.