मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. प्रसाद सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. प्रसादसोबत त्याची बायको मंजिरी ओकही बरीच सक्रिय असलेली पहायला मिळते.
प्रसादसोबत मंजिरी ओकही कायम चर्चेत असते. मराठीसृष्टीतील लोकप्रिय कपलमध्ये त्यांचं नाव येतं. विविध कारणांमुळे दोघे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अशातच दोघे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहेत.
प्रसाद आणि मंजिरी ओकनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. दोघांच्या नव्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
नव्या फोटोंमध्ये दोघांनीही काळ्या कलरचे कपडे परिधान केले आहेत. यामध्ये त्यांचा रोमॅन्टिंग अंदाज पहायला मिळाला.
त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षावही होताना दिसतोय.