मुंबई, 11 जुलै : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर देशभरात वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या घटनेसाठी बॉलिवूडमधील नेपोटिझमला जबाबदार धरण्यात येत आहे. त्याचप्रणामे अनेकांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. भाजपा खासदार रुपा गांगुली आणि अभिनेता शेखर सुमन यांनी काही दिवसांपूर्वी सुशातच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. आता या प्रकरणी CBI चौकशी व्हावी या पक्षामध्ये भाजपाचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी आहेत. त्यांनी वकील ईशकरण भंडारी यांना या प्रकरणी सीबीआय चौकशी करता येईल का अशी विचारणा केली आहे. त्यांनी भंडारी यांना या प्रकरणातील सत्य पडताळून पाहण्यास सांगितले आहे.
I have asked Ishkaran to look into facts of Sushant Singh Rajput death case & see whether it's a fit Case for CBI investigation. Then accordingly to see justice is done. For Updates follow @ishkarnBHANDARI
— Subramanian Swamy (@Swamy39) July 9, 2020
सुब्रमण्यम स्वामी यांच्या म्हणण्यानुसार सध्या ईशकरण या बाबी पडताळून पाहत आहेत की, याप्रकरण कोणते कलम लागू करण्यात येतील- याप्रकरणी ईशकरण हे तपासून पाहत आहेत की याप्रकरणी आर्टिकल 21 बरोबरच आयपीसी सेक्शन 306 आणि 306 देखील लागू होतील का.
दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये दखल घेतल्याबद्दल रुपा गांगुली यांनी ईशकरण यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीट करत सत्याचा शोध घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ईशकरण भंडारी यांनी कागदपत्रे आणि पुरावे शोधत असल्याचा रिप्लाय रूपा यांच्या पोस्टवर केला आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर आलेल्या पोस्ट मार्टम अहवालानुसार त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत 30 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये काही हाय प्रोफाइल नावांचा देखील समावेश आहे.