मुंबई, 17 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ चित्रपट सध्या वादात सापडला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये दीपिकाने घालेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे वाद आणखी चिघळला आहे. सर्वच क्षेत्रातून चित्रपटाला विरोध होत असून चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं सांगितलं जात आहे. हिंदूंकडून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. खरं तर पठाण चित्रपटाला विरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधीही एकापाठोपाठ एक पुढे येत आहेत.अशातच या वादात भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी एक ट्विट करत ‘पठाण’ चित्रपटाविषयी विरोध दर्शवला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ‘पठाण’ चित्रपटाला विरोध केला आहे. त्यांनी ट्विट करत एक व्हिडीओही शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलंय, ‘चित्रपटातील बेशरम रंग गाण्यात हिंदूचा,भगव्याचा अपमान केला गेलाय त्यामुळे मी हिंदूंना आवाहन करते त्यांनी त्यांची कोणतीच फिल्म पाहू नका. जर हिंदूंचे रक्त तुमच्यामध्ये धावत असेल तर त्यांनी या चित्रपटाला तीव्र विरोध करावा आणि हा चित्रपट पाहायला जाऊ नये.’ त्यांचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल व्हायरल होत आहे.
"अगर आप सच्चे हिंदू हैं तो पठान फ़िल्म को नहीं देखेंगे और ना ही इसे चलने देंगे"
— News24 (@news24tvchannel) December 16, 2022
◆ पठान फ़िल्म विवाद पर BJP सांसद @SadhviPragya_MP का बयान pic.twitter.com/HX9TV2jOuq
खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांच्या संपूर्ण वक्तव्यात भगव्या कपड्याचा वापर केल्याचा निषेध केला आहे. हा चित्रपट मध्य प्रदेशातही चालू दिला जाणार नाही. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी जर कायद्याची मदत घ्यावी लागली तर त्यासाठीही तयार आहे, असा इशारा दिला.
दरम्यान, ‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या चित्रपटावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. याशिवाय अनेक राज्यांतूनही याला विरोध होत आहे. काही लोक तर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे आता या सर्व टीकेचा सिनेमावरल काय परिणाम होणार आणि सिनेमा प्रदर्शित होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.