चैन्नई, 18 नोव्हेंबर : दक्षिणेतील स्टार अभिनेत्री आणि अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेल्या खुशबू सुंदर (Kushboo Sundar) यांच्या कारला अपघात (car accident) झाला आहे. सुदैवाने या अपघातातून सुशबू सुंदर थोडक्यात बचावल्या आहे. या अपघाताच्या मागे घातपात असल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे.
आज सकाळी खुशबू सुंदर यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात मेलमरवाथूरजवळ झाला. खुशबू सुंदर एका कार्यक्रमासाठी कडलोरे इथं जात होत्या, त्यावेळी हा अपघात घडला.
याबद्दल खुशबू सुंदर यांनी ट्वीट करून घटनेची माहिती दिली. 'आमची गाडी ही योग्य लेनमधून चालली होती. मात्र, अचानक एका भरधाव टँकरने आमच्या कारला जोरात धडक दिली. कारच्या डाव्याबाजूला ही जबर धडक बसली. आमची कार ही टँकरवर आदळली नाही', असं खुशबू सुंदर यांनी सांगितले.
Met with an accident near Melmarvathur..a tanker rammed into us.With your blessings and God's grace I am safe. Will continue my journey towards Cuddalore to participate in #VelYaatrai #Police are investigating the case. #LordMurugan has saved us. My husband's trust in him is seen pic.twitter.com/XvzWZVB8XR
— KhushbuSundar ❤️ (@khushsundar) November 18, 2020
तसंच, खुशबू सुंदर यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले आहे. आपण मुरुगन देवाच्या कृपेने अपघातातून बचावल्याचंही त्यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहे. या अपघातानंतर आपला कडलोर दौरा हा सुरूच राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
त्याचबरोबर कंटेनरने आपल्या कारला धडक दिली आहे. कारही योग्य लेनमधून जात होती. तेवढ्यात कंटेनरने धडक दिली. त्यामुळे प्रसारमाधम्यांनी याचा विचार करावा, असंही आवाहनही त्यांनी केले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. त्याचबरोबर कंटेनर चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.