मुंबई, 25 मार्च- सूरज बडजात्या (Sooraj R. Barjatya) यांनी हिंदी सिनेसृष्टीला तीन ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. मैंने प्यार किया, हम आपके है कौन आणि हम साथ साथ है. या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पण ‘हम आपके है कौन’ (Hum Aapke Hain Koun) या सिनेमाने त्याकाळात सर्वांनाच वेड लावलं होतं. ‘हम आपके हैं कौन’ सिनेमा रिलीज होऊन आता 29 वर्ष झाले आहेत. पण आजही या सिनेमाचा मोठा चाहता वर्ग आहे. या सिनेमातील प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या आजही लक्षात आहेत. सलमान खान आणि माधुरी दीक्षित, मोहनीश बहल, आलोक नाथ, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू यांच्या या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. खास करून या सिनेमातील माधुरी दीक्षितची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर आजही आधिराज्य गाजवताना दिसते. निशा या भूमिकेमुळं माधुरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
IMDB च्या रिपोर्टनुसार, ‘हम आपके हैं कौन’ या सिनेमातील निशाच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची माधुरी दीक्षित ही पाहिली पसंत नव्हती. या सिनेमात निकी अनेजाची निशाच्या भूमिकासाठी निवड करण्यात आली होती. सूरज बडजात्या यांना या सिनेमात निकी अनेजाला निशाच्या भूमिका करण्यासाठी घ्यायचं होतं. मात्र काही कारणामुळं ती हा सिनेमा करू शकली नाही. मग काय हा सिनेमा माधुरी दीक्षितच्या झोळीत पडला. या भूमिकेमुळं माधुरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
वाचा-शाहिद कपूरच्या ऑनस्क्रीन वहिनीला गंभीर आजार;आवाजही गमावण्याची शक्यता
माधुरीनं घेतली होती सगळ्यात जास्त फी
विशेष म्हणजे माधुरीनं या सिनेमात निशाच्या भूमिकेसाठी सलमान खानपेक्षा जास्त फी घेतली होती. रिपोर्टनुसार, माधुरी या सिनेमात सर्वात जास्ता फी घेणारी महागडी स्टार होती. तिनं या सिनेमात काम करण्यासाठी 2.7 कोटी रूपये घेतले होते. त्याकाळात अभिनेत्रींना मिळाणाऱ्या मानधनाच्या तुलनेत माधुरीची फी ही सर्वात जास्त होती.
सिनेमाच्या नावावरून रंगला होता वाद
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाच्या नावावरून चांगलाच वाद रंगला होता. या सिनेमाच्या चित्रीकरणाला चार वर्षाचा काळ लागला होता. चार वर्षानंतरही सिनेमाचं नाव फायनल झालं नव्हतं. या सिनेमाच्या नावासाठी अनेक लोक काम करत होते मात्र निर्मात्याला एकही नाव पसंद येत नव्हते.
IMDB च्या रिपोर्ट्सनुसार, सूरज बड़जायता यांचे आजोबा आणि कंपनीचे संस्थापक ताराचंद बडजात्या यांना सिनेमातील ‘धिकताना’ या गाणं प्रचंड आवडतं होतं. हेच नाव त्यांना सिनेमाला द्यायचं होतं. शेवटी मात्र त्यांनी हम आपके हैं कौन’ या नावाला पसंती दर्शवली. यामुळं निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यातील नावावरून सुरू असेलाला वाद मिटला आणि सिनेमाचं नाव फायनल झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Madhuri dixit, Salman khan