महिना 3 हजारांची नोकरी करायची; नागिन बनून अदा खान झाली कोट्यवधींची मालकीण

महिना 3 हजारांची नोकरी करायची; नागिन बनून अदा खान झाली कोट्यवधींची मालकीण

आज यशाच्या शिखरावर आहे. (success story of adaa khan) परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य एक काळ असाही होता जेव्हा ती घराचं भाडं भरण्यासाठी चक्क कॉल सेंटरमध्ये काम करत होती.

  • Share this:

मुंबई 12 मे: अदा खान (adaa khan) ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून एळखली जाते. सुंदर चेहरा आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिनं अल्पावधितच मनोरंजनसृष्टीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. (Birthday girl adaa khan) आज अदाचा वाढदिवस आहे. 32 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अदा आज यशाच्या शिखरावर आहे. (success story of adaa khan) परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य एक काळ असाही होता जेव्हा ती घराचं भाडं भरण्यासाठी चक्क कॉल सेंटरमध्ये काम करत होती.

अदाचा जन्म 1989 साली मुंबईतील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. त्यामुळं शाळेत, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि पुढे कॉलेजात ती विविध प्रकारच्या नाटकांमध्ये भाग घेऊन आपली ही आवड पुर्ण करत होती. कॉलेजमध्ये असताना ती एका कॉलसेंटरमध्ये देखील काम करत होती. तिच्या वडिलांची नोकरी सुटली होती त्यामुळं तिचं घर आर्थिक कचाट्यात सापडलं होतं. परिणामी घराचे हफ्ते भरण्यासाठी तिनं कॉल सेंटरमध्ये काम करण्यात सुरुवात केली. त्यावेळी तिला महिन्याला केवळ 3 हजार रुपये पगार मिळत होता.

'शक्तिमान' अगदी ठणठणीत! असल्या अफवा उठवू नका; स्वतः मुकेश खन्नांनीच केलं निधनाच्या बातमीचं खंडन!

परंतु या कॉल सेंटरमुळंच तिचं आयुष्य बदललं. कॉलसेंटरच्या कँटिनमध्ये तिची भेट एका कास्टिंग दिग्दर्शकेशी झाली. तिनं अदाला पेंटालुस मॉडलिंग शोसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला. तिच्या प्रोत्साहानामुळं तिनं त्या शोमध्ये भाग घेतला. पुढे तिची ओळख आणखी काही वेगवेगळ्या ब्रँड्ससोबत झाली. अन् ती जाहिरातींमध्ये झळकू लागली. तिचा अभिनय पाहून 2009 साली ‘पालंपूर एक्सप्रेस’ या मालिकेत तिला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘ये है आशिकी’, ‘फियर फाईल्स’, ‘क्राईम पेट्रोल’ यांसारख्या काही मालिकांमध्ये ती झळकली. दरम्यान तिला खरी लोकप्रियता मिळाली ती एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेमुळं. तिनं या मालिकेत साकारलेली इच्छाधारी नागिणीची भूमिका तुफान गाजली. सध्या ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. येत्या काळात ती काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकणार आहे. अशा प्रकारे एका कॉलसेंटरमध्ये काम करणारी तरुणी झाली कोट्यवधींची मालकीण.

Published by: Mandar Gurav
First published: May 12, 2021, 8:46 AM IST

ताज्या बातम्या