मुंबई, 11 मार्च- 'कसौटी जिंदगी के' (Kasauti Zindagi Kay) मध्ये अनुराग बासूची (Anurag Basu) भूमिका साकारत पार्थ समथान (Parth Samthan) हा टीव्ही अभिनेता घराघरात पोहोचला आहे. अनुराग बासूच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांनी त्याला प्रचंड पसंत केलं होतं. याशिवाय पार्थ समथानने कैसी है यारियां, 'गुमराह', 'बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर', 'सावधान इंडिया' सह अनेक शोमध्ये काम केलं आहे. आज पार्थ समथान त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर चाहते पार्थ समथानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.यानिमित्ताने अभिनेत्याच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांवर एक नजर टाकूया.
पार्थ समथान हा खास करून तरुणवर्गाचा प्रचंड आवडता आहे. कारण या अभिनेत्याने कैसी है यारियांसारखे तरुणाईंना आकर्षित करणारे शो केले आहेत. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. यामध्ये माणिक आणि नंदिनीने तरुणाईंवर भुरळ पाडली होती. पार्थने माणिकची भूमिका साकारली होती. तर नीती टेलरने नंदिनीची. या दोघांची केमिस्ट्री तरुणांना प्रचंड आवडली होती. हे झालं पडद्यावरील परंतु तुम्हाला पार्थच्या खाजगी आयुष्याबद्दल माहिती आहे का? अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय.
आपल्या स्टायलिश लुकसोबतच पार्थ समथान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असतो. त्याचे नाव यापूर्वीही अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेदरम्यान त्याचं नाव सीरियलची मुख्य अभिनेत्री एरिका फर्नांडिसशी जोडलं गेलं होतं. याशिवाय पार्थ समथानने एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीलाही डेट केलं आहे. ती अभिनेत्री सध्या बॉलिवूड सुपरस्टारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
(हे वाचा:जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?)
पार्थ समथानने डेट केलेली बॉलिवूड अभिनेत्री दुसरी कुणी नसून अभिनेत्री दिशा पाटनी आहे. पार्थ समथानने काही वर्षांपूर्वी अभिनेत्री दिशा पटानीला डेट केलं होतं. सध्या दिशा पाटनी बॉलिवूड अॅक्शन स्टार टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्थ समथान आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये होते. पार्थच्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आणि त्यांचं नातं संपुष्टात आलं. विशेष म्हणजे दिशा आणि पार्थचं नातं कुणा अभिनेत्रीमुळे नव्हे तर अभिनेत्यामुळे तुटलं होतं. अनेक रिपोर्ट्सनुसार पार्थ त्यावेळी टीव्ही प्रोड्युसर विकास गुप्तासोबत डेट करत होता. त्यामुळे दिशा आणि त्याच्या नात्याचा द एन्ड झाला होता. मात्र, पार्थने नेहमीच या गोष्टीला नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Disha patani, Entertainment, Tv actor