मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD Sonu Sood: 'रिअल लाईफ हिरो' सोनू सूद आहे 'इतक्या' कोटींचा मालक, आकडा वाचून व्हाल थक्क

HBD Sonu Sood: 'रिअल लाईफ हिरो' सोनू सूद आहे 'इतक्या' कोटींचा मालक, आकडा वाचून व्हाल थक्क

sonu sood birthday

sonu sood birthday

सोनू सूद (Sonu Sood) ‘रील लाईफ’मध्ये जरी खलनायकाच्या भूमिका करत असला, तरी ‘रिअल लाईफ’मध्ये नक्कीच हिरो आहे. वाचा त्याची संपत्ती किती आहे.

मुंबई, 30 जुलै : सोनू सूद हे नाव गेल्या दोन वर्षांमध्ये तुम्ही वारंवार ऐकलं असेल. कोणताही मोठा सिनेमा रिलीज न होता, किंवा सिनेमामध्ये ‘हिरो’ची भूमिका न करताही हा अभिनेता सध्या जगभरात प्रसिद्ध झाला आहे. याला कारण म्हणजे, सोनू सूद (Sonu Sood) ‘रील लाईफ’मध्ये जरी खलनायकाच्या भूमिका करत असला, तरी ‘रिअल लाईफ’मध्ये नक्कीच हिरो आहे. कोरोना काळात सोनूने कित्येक विस्थापित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम केलं होतं. यानंतरही वेळोवेळी शक्य होईल त्या व्यक्तीची मदत करून सोनू आज या लोकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. 30 जुलै 1973 रोजी पंजाबमधील मोगा गावात सोनू सूदचा जन्म (Happy Birthday Sonu Sood) झाला. आज त्याचा वाढदिवस आहे. सिनेसृष्टीत आल्यानंतर सोनूने दाक्षिणात्य आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलं. मात्र, सध्या जर त्याचं नाव तुम्ही गुगल केलं, तर त्याने केलेल्या मदतीच्या (Sonu Sood help people) बातम्याच तुम्हाला सर्वांत आधी दिसतील. ट्विटरवर (Sonu Sood Twitter) दररोज सोनूला मेन्शन करून कित्येक लोक मदत मागतात. कोणी नोकरी मिळवून देण्यासाठी, कोणी व्यवसाय सुरू करून देण्यासाठी, कोणी शिक्षणासाठी तर कोणी मेडिकल इमर्जन्सीसाठी. यातील ज्या ज्या व्यक्तींची मदत करणं शक्य आहे, त्या सर्वांची मदत सोनूने केली आहे. मात्र सोनू हे सगळं का करत आहे? याचं उत्तर त्यानेच एका मुलाखतीत दिलं होतं. हेही वाचा  -  Pushpa 2 मधून अल्लू अर्जुनचा डबल फायर लुक व्हायरल, इंटरनेटचंही तापमान वाढवलं यामुळे सुरू केली मदत खरं तर याची सुरुवात कोरोना महामारीच्या (Sonu Sood lockdown help) काळात झाली. अचानक लागू केलेल्या लॉकडाउनमुळे देशातील सगळे व्यवहार ठप्प झाले होते. अशात काम बंद झाल्यामुळे कित्येक परप्रांतीय मजूर आपापल्या मूळ गावी जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र वाहतुकीची साधनंही बंद असल्यामुळे शेवटी ते मजूर आपल्या कुटुंबीयांसह चालतच आपल्या राज्यात निघाले होते. “जेव्हा मी या मजुरांना आपल्या कुटुंबीयांसोबत असं चालत जाताना पाहिलं, तेव्हा मला भरपूर त्रास झाला. ही तीच मंडळी आहेत, ज्यांनी आमची घरं, आमचे रस्ते, आमचे स्टुडिओ बांधले आहेत ही जाणीव मला झाली. त्यामुळे या सगळ्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार माझ्या मनात आला.” असं सोनूने एका मुलाखतीत (Sonu Sood Interview) सांगितलं.
View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

एवढ्यावरच थांबला नाही सोनू  पहिल्या टप्प्यामध्ये परप्रांतीय मजुरांना मदत केल्यानंतर सोनू थांबला नाही. त्याने विविध मार्गाने लोकांची मदत करणं सुरूच ठेवलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासू लागली होती. तेव्हा सोनूने कोरोनावरील औषधांचा आणि ऑक्सिजन सिलिंडरचा बंदोबस्त केला होता. तसंच, सोनूने वेळोवेळी अनेकांची वैयक्तिक गोष्टींसाठीदेखील मदत केली आहे. सोनूच्या या कामामुळे आता लोकांसाठी तो ‘देवदूत’ झाला आहे. कित्येकांनी तर ट्विटरवर सोनूला भावी पंतप्रधान केलं पाहिजे, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. एवढी आहे सोनूची संपत्ती बॉलिवूड, टॉलिवूड अशा दोन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मेहनत करून सोनूने भरपूर पैसा कमावला आहे. सिनेमांसोबतच जाहिरातींच्या माध्यमातूनही सोनू पैसे (Sonu Sood net worth) कमवतो. मीडिया रिपोर्टनुसार सोनूच्या एकूण संपत्तीची किंमत सुमारे 131 कोटी रुपये (Sonu Sood Property) आहे. मुंबईतील लोखंडवाला भागात सोनूचं एक शानदार घर आहे. सोबतच, जुहूमध्ये त्याच्या मालकीचं एक हॉटेलही आहे. वारंवार लोकांची मदत करून चर्चेत आल्यामुळे सोनूवर टॅक्स चुकवल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर प्राप्तीकर विभागाने त्याच्या घराची झडतीही घेतली होती. मात्र, एवढ्या अडचणी येऊनही सोनू आजही लोकांची मदत करतोच आहे.
First published:

Tags: Birthday celebration, Bollywood, Bollywood actor, Entertainment, Property, Sonu Sood

पुढील बातम्या