करीना जॉनला म्हणाली एक्सप्रेशन लेस; संतापलेल्या बिपाशानं बोलती केली बंद

करीना जॉनला म्हणाली एक्सप्रेशन लेस; संतापलेल्या बिपाशानं बोलती केली बंद

या टीकेवर जॉनची एक्स गर्लफ्रेंड बिपाशा बासु (Bipasha Basu) हिनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिनं असं उत्तर दिलं की ज्यामुळं करीनाची बोलतीच बंद झाली.

  • Share this:

मुंबई 1 मे: प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा ती स्पष्टवक्तेपणामुळं आपल्या सहकलाकारांना देखील दुखावते. असाच काहीसा प्रकार तिनं अभिनेता जॉन अब्राहमसोबत (John Abraham) केला होता. “जॉन हा असा अभिनेता आहे ज्याच्या चेहऱ्यावर कुठलेच हावभाव नसतात. तो एकाच एक्सप्रेशनमध्ये सर्व भूमिका साकारतो” अशी टीका करीनानं काही वर्षांपूर्वी केली होती. तिच्या या टीकेवर जॉनची एक्स गर्लफ्रेंड बिपाशा बासु (Bipasha Basu) हिनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिनं असं उत्तर दिलं की ज्यामुळं करीनाची बोलतीच बंद झाली.

प्रकरण काय आहे?

करीनानं दोन वर्षांपूर्वी ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं जॉनच्या करिअरवर भाष्य करताना त्याची खिल्ली उडवली होती. “तो एक एक्सप्रेशन लेस अभिनेता आहे. सर्व चित्रपटांमध्ये तो एकाच प्रकारचे हावभाव ठेवून काम करतो.” तिच्या या टीकेवर आता बिपाशा बासू हिनं प्रत्युत्तर दिलं आहे. अलिकडेच टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं या प्रसंगावर भाष्य करताना उलट करीनाचीच खिल्ली उडवली. “इतरांनाचे एक्सप्रेशन पाहण्यापूर्वी आधी स्वत:कडे पाहा. स्वत:च्या ओव्हर अॅक्टिंगवर आधी काम कर.” असा जोरदार टोला तिनं करीनाला लगावला आहे.

ताराच्या सौंदर्याला लागले चार चाँद; पाहा फेमिनासाठी केलं Bold फोटोशूट

करीना आणि बिपाशामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शीतयुद्ध सुरु आहे. 2001 साली ‘अजनबी’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांचं भांडण झालं होतं. हे भांडण इतकं वाढलं होतं की त्यांना एकमेंकांचा चेहरा देखील पाहायचा नव्हता. त्यांच्या भांडणामुळं चित्रीकरण देखील काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर अनेकदा दोघांनी एकमेकांवर टीका केली आहे. एकदा बिपाशानं करीनाच्या कपड्यांवर टीका होती. त्यावेळी प्रत्युत्तर देताना करीनानं तिला ‘काळी मांजर’ असं म्हटलं होतं.

Published by: Mandar Gurav
First published: May 1, 2021, 2:21 PM IST

ताज्या बातम्या