जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sonali Phogat मृत्यूप्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी; PA सुधीर सांगवानची अखेर कबुली?

Sonali Phogat मृत्यूप्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी; PA सुधीर सांगवानची अखेर कबुली?

sonali phogat

sonali phogat

‘बिग बॉस’ फेम आणि भाजप नेत्या सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच नवी अपडेट समोर आलीये.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 सप्टेंबर: ‘बिग बॉस’ फेम आणि भाजप नेत्या सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सोनाली यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. खून झाल्याच्या संशयानं याप्रकरणी चौकशी सुरु असून रोज नवी माहिती समोर येतीये. अशातच सोनाली फोगट खून प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी येत आहे. सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आलीये. एबीपीच्या वृत्तानुसार, सोनाली फोगटच्या मृत्यूचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवान याने दिल्याची माहिती गोवा पोलीस सूत्रांनी दिली आहे. कोठडीत चौकशीदरम्यान सोनाली फोगटला गुडगावहून गोव्यात आणण्याचा कट रचल्याची कबुली सुधीर सांगवानने दिल्याचं समोर आलंय. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लान नव्हता, गोव्यात आणण्याचा हा कट होता, असं पोलिसांनी सांगितल्याचं एबीपीने वृत्तात म्हटलं आहे. हेही वाचा -  ‘हा खूप पर्सनल प्रश्न आहे’; ‘ती’ कमेंट करणाऱ्या महिलेवर भडकली Hemangi Kavi गोवा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगटच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता. दरम्यान, या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंबंधीत काही कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. सोनाली फोगटच्या हत्येतील आरोपींना जबाबदार धरण्यासाठी खटल्यादरम्यान न्यायालयात ते पुरेसे ठरतील असा विश्वासही गोवा पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याआधी पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये सोनाली फोगटचा पीए सुधीर सांगवान, मित्र सुखविंदर सिंह,ड्रग्स पेडलर, हॉटेल मालक, आणि ड्रग्स तस्कर यांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात