• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss OTT: 'दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार'; नेहा भसीनची मोठी प्रतिक्रिया

Bigg Boss OTT: 'दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार'; नेहा भसीनची मोठी प्रतिक्रिया

नुकताच 'बिग बॉस OTT' चा महाअंतिम सोहळा पार पडला. महाअंतिम सोहळ्याच्या अवघ्या ३ दिवस आधी गायिका नेहा भसीन शोधून बाहेर झाली होती.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर- सर्वात जास्त लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणून 'बिग बॉस'ला ओळखलं जातं. हा शो नेहमीच आपल्या स्पर्धकांमुळे चर्चेत असतो. नुकताच बिग बॉसचा नवा व्हर्जन 'बिग बॉस OTT' (Bigg Boss OTT) ने नुकताच आपला निरोप घेतला आहे. मात्र तरीसुद्धा हा शो चर्चेत आहे. नुकताच स्पर्धक नेहा भसीनने (Neha Bhasin) विजेती दिव्या अग्रवालवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
  'बिग बॉस १५' च्या ६ आठवडे आधी डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'बिग बॉस OTT' सुरू करण्यात आला होता. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. यामध्ये दिव्या अग्रवाल ही विजेती ठरली आहे. दिव्याबद्दल बोलताना घरातील स्पर्धक नेहा भसीनने एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'बिग बॉस OTT' च्या घरात स्पर्धक नेहा भसीन एक दमदार स्पर्धक होती. मात्र तिचं दिव्या अग्रवाल, मूस चट्टान आणि अक्षरा सिंगसोबत अजिबात पटत नव्हतं. या स्पर्धकांसोबत तिची सतत वादावादी होत असे. घरातून बाहेर झाल्यानंतर नेहा भसीनने मोठी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं, दिव्या अग्रवालसारखे लोक तिच्या डोक्याशी खेळत आहेत. त्यामुळे तिला डिप्रेशनला समोर जावं लागलं होत. इतकंच नव्हे तर यामुळे तिच्या डोक्यात आत्महत्येसारखे भयानक विचार येत होते. नुकताच 'बिग बॉस OTT' चा महाअंतिम सोहळा पार पडला. महाअंतिम सोहळ्याच्या अवघ्या ३ दिवस आधी गायिका नेहा भसीन शोधून बाहेर झाली होती. घरातून बाहेर आल्यानंतर नेहाने झी न्यूज डिजिटलला एक मुलाखत दिली होती. यावेळी बोलत असताना तिने, दिव्या अग्रवाल आणि आपल्यामध्ये अंतर्वस्त्रांवरून झालेल्या वादावर खुलासा केला होता. यावेळी बोलताना नेहा म्हणाली, 'मला खूप कमी गोष्टी प्रभावित करू शकतात. मात्र दिव्यासोबत अंतर्वस्त्रांवरून झालेला वाद खूपच माझ्या डोक्यात बसला होता. अनेकांनी मला तोडण्याचा प्रयत्न केला. मला तोडणं खूप कठीण आहे. मी दाखवले नसले तरी मला फरक पडत होता. मी रडत होते'. (हे वाचा:Bigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप) ती पुढे म्हणाली, 'शोमध्ये दिव्या माझ्या बुद्धीशी खेळत होती. ती तेच तेच परत परत करत होती. त्यामुळे माझ्यावर खूप जास्त प्रभाव पडला आहे. मी आत्ता जे काही बोलणार आहे, ते खूपच मोठं विधान आहे. यासाठी मी कुटुंबाची आणि सर्वांची माफी मागते. मात्र हे खरं आहे, की दिव्याच्या या वागण्याने माझ्यावर इतका नकारात्मक प्रभाव पडला होता, की माझ्या मनात आत्महत्येचे विचार घोंघावत होते. माझ्या करिअरच्या सुरुवातीलाचा दिव्याने मला तोडलं. फक्त मीच नव्हे तर घरातील अनेक स्पर्धकांसोबत दिव्याने असंच केलं आहे'. (हे वाचा:Bigg Boss Marathi 3: जय दुधाणे म्हणतो, गेमसाठी कनेक्शन बनवायची गरज पडली तर...) यावर स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने म्हटलं आहे, 'मला हे सर्व खूप मजेशीर वाटलं. एखादा व्यक्ती कोणाला इतकं प्रभावित कस करू शकतो. आणि नेहा तर नेहमी म्हणायची मी खूप मजबूत आहे. ती मला यासाठी कारणीभूत ठरवत आहे. मात्र तिने घरामध्ये काय केलं आहे. आधी तिने दुसऱ्या महिलांवर टीका करणं बंद केलं पाहिजे. त्यानंतरचं सर्वकाही ठीक होईल. मला असं वाटतं की नेहाला फक्त एक मोठा जबाब द्यायचा होता. म्हणून तिने हे म्हटलं असावं. नेहा लवकर यातून बाहेर पडावी हीच देवाकडे अपेक्षा करते'. असं म्हणत दिव्याने आपली बाजू मांडली होती.
  Published by:Aiman Desai
  First published: