जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Neha Shitole: 'महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता..', 'BBM फेम नेहा शितोळेची पोस्ट चर्चेत

Neha Shitole: 'महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता..', 'BBM फेम नेहा शितोळेची पोस्ट चर्चेत

Neha Shitole: 'महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता..', 'BBM फेम नेहा शितोळेची पोस्ट चर्चेत

‘बिग बॉस मराठी’ हा लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो समजला जातो. या शोमधील स्पर्धकांदेखील प्रचंड लोकप्रियता मिळत असते. ‘बिग बॉस मराठी 2’ ची अभिनेत्री स्पर्धक नेहा शितोळेसुद्धा अशीच लोकप्रिय झाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जुलै-  ‘बिग बॉस मराठी’ हा लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो समजला जातो. या शोमधील स्पर्धकांदेखील प्रचंड लोकप्रियता मिळत असते. ‘बिग बॉस मराठी 2’ ची अभिनेत्री स्पर्धक नेहा शितोळेसुद्धा अशीच लोकप्रिय झाली होती. बिग बॉसमुळे होस्ट आणि मराठी-हिंदीतील दिग्गज दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकरांसोबत तिचं खास बॉडिंग तयार झालं होतं. दरम्यान आता अभिनेत्रीने त्यांच्याबाबत एक खास पोस्ट लिहली आहे. पाहूया ती पोस्ट नेमकी काय आहे. नेहा शितोळे पोस्ट- Mahesh Manjrekar - महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता भेटणं सुद्धा जिथे कमाल वाटतं तिथे त्यांनी तुम्हाला appreciate करणं, त्यांच्या सोबत काम करायला मिळणं आणि त्यांचं थोडं प्रेम आपल्या वाट्याला येणं… हे सगळं अविश्वसनीय आहे… Thank you @maheshmanjrekar sir… माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल…एका वेगळया रुपात लोकांसमोर आणल्या बद्दल… माझ्या शब्दांना योग्य न्याय दिल्याबद्दल…’. वास्तविक नेहा शितोळे एका नव्या रूपात आपल्या भेटीला येत आहे. याबाबतची माहिती आम्ही आपल्याला कालच दिली होती. नेहा एक गीतकार म्हणून पदार्पण करत आहे. या अभिनेत्रीने नुकतंच महेश मांजरेकरांच्या एका चित्रपटासाठी गाणं लिहलं आहे. हा चित्रपट दुसरा कोणता नसून ‘दे धक्का 2’ आहे. या चित्रपटातील ‘देह फुटू दे’ हे मार्मिक गाणं अभिनेत्रीने लिहलं आहे.

जाहिरात

**(हे वाचा:** Tejashree Pradhan: सासूने सुनेला दिली फक्कड मेजवानी, शुभ्रा-असावरी पुन्हा एकत्र ) नेहा शितोळे ‘बिग बॉस मराठी 2’ च्या माध्यमातून घराघरात पोहोचली होती. या शोमध्ये अभिनेत्रीचा अगदी धाकड अंदाज दिसून आला होता. शोमुळे नेहा प्रचंड लोकप्रिय झाली होती. कामाबाबत सांगायचं तर अभिनेत्रीने ‘देऊळ’ या चित्रपटातून मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनतर तिने अनेक चित्रपट केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात