मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Amruta Dhongade: 'बिग बॉस' संपताच अमृताने थेट गाठलं कोल्हापूर; घेतलं ज्योतिबाचं दर्शन,झालं जंगी स्वागत

Amruta Dhongade: 'बिग बॉस' संपताच अमृताने थेट गाठलं कोल्हापूर; घेतलं ज्योतिबाचं दर्शन,झालं जंगी स्वागत

अमृता धोंगडे

अमृता धोंगडे

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक असणारा शो म्हणजे 'बिग बॉस मराठी' होय. नुकतंच बिग बॉस मराठीचा चौथा सीजन पार पडला. दरवर्षीप्रमाणे हा सीजनसुद्धा धमाकेदार ठरला. शोमध्ये अनेक वादविवाद, राडे, मैत्री आणि प्रेमसुद्धा पाहायला मिळालं.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई,20 जानेवारी- छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक असणारा शो म्हणजे 'बिग बॉस मराठी' होय. नुकतंच बिग बॉस मराठीचा चौथा सीजन पार पडला. दरवर्षीप्रमाणे हा सीजनसुद्धा धमाकेदार ठरला. शोमध्ये अनेक वादविवाद, राडे, मैत्री आणि प्रेमसुद्धा पाहायला मिळालं. अभिनेता-स्पर्धक अक्षय केळकर यंदा महाविजेता ठरला. परंतु बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांची तुफान चर्चा झाली. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे कोल्हापूरची लवंगी मिर्ची अभिनेत्री अमृता धोंगडे होय. अमृताने बिग बॉसच्या घरात टॉप 4 मध्ये मजल मारली होती.

'बिग बॉस मराठी'चं यंदाचं सीजनसुद्धा तुफान लोकप्रिय ठरलं. मध्यंतरी काही टीकासुद्धा झाल्या. परंतु एकंदरीत बिग बॉस मराठीचा धमाकेदार शेवट झाला. अक्षय केळकरने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या पर्वाची उपविजेती ठरली होती. दरम्यान या सीजनच्या टॉप 4 मध्ये अभिनेत्री आणि कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता धोंगडेने आपलं स्थान निर्माण केलं होतं. बिग बॉस मराठीमुळे सहभागी झालेल्या स्पर्धकांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. या शोमुळे स्पर्धकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

(हे वाचा:Apurva Nemlekar: बिग बॉस संपताच अपूर्वा नेमळेकरचं महेश मांजरेकरांबाबत धक्कादायक विधान; म्हणाली, त्यांच्या सूचना..' )

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत झळकलेले अभिनेत्री अमृता धोंगडेसुद्धा बिग बॉस मराठीमुळे प्रचंड चर्चेत आली होती. बिग बॉसचा सीजन संपल्यानंतरसुद्धा अमृता अजूनही चर्चेत आहे. अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. अभिनेत्री सतत आपल्या विविध पोस्ट शेअर करत. चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते. अमृता सतत इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतंच अमृताची नवी पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्री बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आपल्या गावी कोल्हापूरला आणि तिथून ज्योतिबा दर्शनाला पोहोचली आहे. याबाबत अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अमृता धोंगडे पोस्ट-

''Bigg Boss मधून बाहेर आल्यावर सगळ्यात आधी कोल्हापूर ला गेले घरी जंगी स्वागत झालं, कौतुक सोहळा झाला, आणि त्यानंतर थेट गेले ते ज्योतिबा ला तुम्हा सर्वांच्या support मुळे आणि ज्योतिबा च्या आशीर्वादा मुळे Bigg Boss Marathi season 4 ची finalist झाले... ज्योतिबाच्या नावानं चांगभलं''

अमृता धोंगडे ही मूळची कोल्हापूरची आहे. अमृताने याआधी झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत काम केलं आहे. यामध्ये तिने 'सुमी'अर्थातच सुमनची भूमिका साकारली होती. यामध्ये अमृतासोबत अभिनेता तेजस बर्वे झळकला होता. त्यांनतर अमृताला बिग बॉस मराठीमुळे एक नवी ओळख मिळाली आहे. बिग बॉसची फायनलिस्ट बनलेल्या अमृताला चाहत्यांसोबतच मूळ गाव कोल्हापुरातूनही प्रचंड सपोर्ट मिळाला होता. कोल्हापूरकरांनी विषय हार्ड करत थेट गावागावात अमृताचे होर्डिंग्स लावले होते.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment