कुंकू टिकली आणि टॅटू' आणि 'रात्रीस खेळ चाले' या मालिकांमध्ये आदिशने काम केलं आहे. त्यासोबत 'जिंदगी नॉट आउट', 'बॅरिस्टर बाबू', 'गुम है किसीं के प्यार में', 'नागीण' या हिंदी मालिकांमध्येही तो झळकला आहे. 'गुम है किसी के प्यार में' या लोकप्रिय मालिकेतील आदिशची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. परंतु, बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी आदिशने मालिकेचा निरोप घेतला. आपल्या हटके लूकने प्रेक्षकांना भुरळ घालणारा आदिश मराठमोळी अभिनेत्री रेवती लेले हिच्यासोबत रिलेशनमध्ये आहे. वाचा-'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनची पत्नी सुंदरतेत बालिवूड अभिनेत्रींना देते मात! रेवती एक उत्कृष्ट नृत्यांगना असून आदिश आणि रेवती यांनी 'नागीण', 'जिंदगी नॉट आउट' या मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे. रेवतीने कलर्स मराठी वाहिनीवरील 'स्वामींनी' या मालिकेत मोठया रामाबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून रेवतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment