मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Video: देवोलिनाने अभिजीत बिचुकलेला हासडली अशी काही शिवी..; मग जे झालं ते पाहाचं

Video: देवोलिनाने अभिजीत बिचुकलेला हासडली अशी काही शिवी..; मग जे झालं ते पाहाचं

‘बिग बॉस15’ (Bigg Boss 15) च्या घरात एका टास्कवेळी देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले (Devoleena Bhattacharjee Abhijeet Bichukle)  यांच्यात चांगलाच राडा झाला आहे.

‘बिग बॉस15’ (Bigg Boss 15) च्या घरात एका टास्कवेळी देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले (Devoleena Bhattacharjee Abhijeet Bichukle) यांच्यात चांगलाच राडा झाला आहे.

‘बिग बॉस15’ (Bigg Boss 15) च्या घरात एका टास्कवेळी देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले (Devoleena Bhattacharjee Abhijeet Bichukle) यांच्यात चांगलाच राडा झाला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 डिसेंबर- ‘बिग बॉस15’ (Bigg Boss 15) चा फिनाले जवळ आला आहे. फिनालेमध्ये राहण्यासाठी घरातील सदस्य वाटेल ते करण्यासाठी तयार आहेत. यावेळी फक्त राखी सावंतने (Rakhi Sawant) फिनालेमध्ये तिची जागा पक्की केली आहे. आता घरातील इतर मंडळी देखील फिनालेपर्यंत जाण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार होत आहेत. यासाठी सदस्यांनी अनेकवेळा ‘टिकट टू फिनाले’ हा टास्क देखील रद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावेळी बिग बॉसने त्यांची खेळी त्यांचवरच उलटवली आहे. कारण आता टास्क फिनालेसाठी नाही तर या घरात टिकून राहण्यासाठी होणार आहे. म्हणजे आता कुठल्या एका स्पर्धकाला यातून बाहेर जावे लागणार आहे. याच टास्कवेळी देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले (Devoleena Bhattacharjee Abhijeet Bichukle) यांच्यात चांगलाच राडा झाला आहे. याचा प्रोमो देखील समोर आला आहे.

देवोलिना बिचुकलेला म्हणाली कुत्रा...

लेटेस्टे प्रोमोमध्ये (Bigg Boss 15 Latest Promo) पाहू शकतो की, सर्वजण टास्क खेळत आहेत. एका बॉक्सच्या आतमध्ये अभिजीत बिचुकले आहे. बिचुकलेला बाहेर काढण्यासाठी सर्व स्पर्धक प्रयत्न करत आहेत. यावेळी स्पर्धकांच्या चुकीच्या वागणुकीवर देखील बिग बॉसने चांगलेच सुनावले आहे. देवोलिनाचा चढलेला पार पाहून असंच दिसत आहे की, हे टास्क देखील रद्द होणार. यावेळी रागाच्या भरात देवोलिना बिचुकलेला कुत्रा म्हणताना दिसत आहे. यानंतर बिचुकले देखील चांगालाच भडकलेला दिसत आहे.

वाचा-4 वर्षानी शाहरुख करणार कमबॅक, 'पठान'च्या सेटवरील फोटो आला समोर

एका स्पर्धकाचा खेळ संपणार

या व्हिडिओत देवोलिना रागाच्या भरात बिचुकलेला म्हणतेय की , तुला जर टास्क रद्दच करायचे होते तर मला का सांगितले नाहीस. त्याच्यावेळी ती त्याला कुत्रा असं म्हणते. यावर बिचुकले म्हणतो की,मला कुत्रा म्हणू नकोस. यानंतर दोघांच्यात चांगलाच राडा होतो. बिग बॉसच्या बोलण्यावरून तर एकच स्पष्ट होत आहे की, यानंतर कुणच्या तरी एका स्पर्धकाचा या घरातील खेळ लवकरच संपणार आहे.

अभिजीतने मागितली होती 'पप्पी'

याआधी अभिजीत बिचुकलेने देवोलिनाला 'पप्पी' देणार का असं विचारल्यावर शोमध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. सलमान खाननेही अभिजीतचा चांगलीच शाळा घेतली होती, पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. नुकतेच अभिजीतने देवोलिनासमोर इमरान हाश्मी बनण्याची इच्छा व्यक्त केली.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Tv shows