मुंबई, 5 ऑक्टोबर- बिग बॉसच्या सोळाव्या सीजनला सुरुवात होताच बिग बॉसच्या जुन्या सीजनचे स्पर्धकसुद्धा चर्चेत आले आहेत. हे स्पर्धक इतर कुणी नसून टीव्हीचा अँग्री यंग मॅन एजाज खान आणि पवित्रा पुनिया आहेत. या दोघेही बिग बॉसच्या घरातच भेटले होते. या घरातच दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांवर प्रेमाची कबुली दिली होती. आता हे जोडपं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यंदा कारण मात्र फारच खास आहे. या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचं वृत्त समोर आलं आहे. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडपं एजाज खान आणि पवित्रा पुनिया सतत आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. ते दोघेही सतत एकमेकांसोबत रोमँटिक होतांना दिसून येतात. एजाज आणि पवित्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पवित्राने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करुन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या फोटोमध्ये ती आपल्या साखरपुड्याची अंगठी फ्लॉंट करताना दिसत आहे.पवित्राचे हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर या जोडप्याने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सुरु झाली आहे. एजाजने हे फोटो शेअर करत पवित्राने आपल्याला लग्नासाठी होकार दिल्याचं म्हटलं आहे. बिग बॉसच्या घरात अनेक लव्हस्टोरी पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये काही रिलेशनशिप लग्नापर्यंत पोहोचली आहेत. तर काहींनी मध्येच ब्रेकअप केला आहे. अभिनेता एजाज खान आणि पवित्रा पुनियादेखील बिग बॉसच्या घरात भेटले होते. या दोघांची लव्हस्टोरी ‘बिग बॉस 14’ च्या घरात सुरु झाली होती आणि ती आता हळूहळू लग्नापर्यंत पोहोचताना दिसत आहे. हे जोडपं सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना आणि मस्ती करताना दिसून येतं. पवित्रा आणि पुनिया गेल्या 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
एजाज खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये पवित्रा एक सुंदर डायमंड रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘जर आपण योग्य वेळेची वाट पाहात राहिलो, तर ती कधीच येणार नाही. मी तुला माझं सर्वोत्तम वचन देतो. तू माझ्याशी लग्न करशील का ? आणि तिने ‘हो’ म्हटलं’. असं म्हणत एजाजने आपला आनंद व्यक्त केला आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. पवित्रा आणि एजाजचे हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
**(हे वाचा:** Bigg Boss 16: शिव ठाकरे-सौंदर्या शर्मामध्ये कॉफीवरुन जोरदार राडा; अभिनेत्याने जोडले हात ) एजाज आणि पवित्राच्या चाहत्यांना आता या दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागून आहे. हे दोघे कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लहान लागून आहे. बिग बॉसमुळे या लोकप्रियता मिळाली होती. बिग बॉसच्या घरात या जोडीला मोठी पसंती मिळाली होती. बिग बॉसनंतरच त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं.