Home /News /entertainment /

तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यावर भडकला करण कुंद्रा;'तो' मेसेज ठरला कारणीभूत

तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यावर भडकला करण कुंद्रा;'तो' मेसेज ठरला कारणीभूत

छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' (Bigg Boss) हा रिऍलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. या शोमध्ये अनेक लव्हबर्ड जोड्या बनल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाश होय. टीव्ही इंडस्ट्रीतील हँडसम हंक करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश (Karan Kundra & Tejasswi Prakash) यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 जून-  छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस'  (Bigg Boss)  हा रिऍलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. या शोमध्ये अनेक लव्हबर्ड जोड्या बनल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाश होय. टीव्ही इंडस्ट्रीतील हँडसम हंक करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश (Karan Kundra & Tejasswi Prakash)  यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. बिग बॉस 15 मध्ये हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. इतकंच नव्हे तर नॅशनल टेलिव्हिजनवर या जोडीने एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं होतं. या जोडप्याला त्यांचे चाहते भरभरुन प्रेम देत असतात. त्यांच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला लाईक्स देत असतात. मात्र काही लोक असेही आहेत जे या जोडप्याला प्रचंड ट्रोल करतात. सोशल मीडियावर या दोघांना संमिश्र प्रतिक्रिया मिळत असतात. नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगचा कधी-कधी कलाकारांना अति त्रास सहन करावा लागतो. यातून काही कलाकार सोशल मीडियाचाच आधार घेत ट्रोलर्सना प्रत्युत्तर देत असतात. दरम्यान आता करण आणि तेजस्वीने असंच काहीसं केलं आहे. BollywoodLife.com च्या रिपोर्टनुसार, नुकतंच तेजस्वीच्या एका चाहत्याने करण कुंद्राला एक असा मेसेज पाठवला होता. जो पाहून करणच नाही तर तेजस्वीही निराश झाली आहे. तेजस्वीच्या या चाहत्याने करणसाठी 'मृत्यू'ची इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडिया यूजरने असंही लिहिलं आहे की, करणचा मृत्यू झाल्यास बिग बॉस 15ची विजेती कशी मुक्त होईल'. या मेसेजने करण आणि तेजस्वीसोबतच त्यांचे चाहतेसुद्धा चकित झाले आहेत. (हे वाचा:श्रुती हसन बॉयफ्रेंड शंतनूसोबत कधी करणार लग्न? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा ) यावर प्रतिक्रिया देत करण कुंद्राने ट्विटरवर ट्विट करत लिहलंय, 'ही त्यांत खालची पातळी आहे. करणने त्याच्या ट्विटमध्ये पुढे लिहलंय- 'क्या बात है... ही कल्पनारम्य, एडिटेड फोटो, मॉर्फेड अॅब्सची सर्वात खालची पातळी आहे. हाहा माझा अपमान. तुम्हाला त्यांचा खूप अभिमान असायला हवा''. यावर ट्विट करत तेजस्वीने लिहलंय की, जे करणला ट्रोल करत आहेत ते तिचे चाहते असूच शकत नाहीत. अशा लोकांनी समजून घेतलं पाहिजे की अशा नकारात्मकतेचा लोकांवर कसा परिणाम होऊ शकतो''.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bigg boss, Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या