मुंबई, 10 ऑक्टोबर : बिग बॉसचं घर म्हणजे वाद विवाद आलेच. हा कार्यक्रमाचा प्रत्येक सिझन अनेक कारणांमुळे चर्चेत राहतो. ‘बिग बॉस हिंदी’च्या 16 व्या पर्वाला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. पण यावेळी त्याआधीपासूनच वाद सुरु झाला होता. तो बिग बॉसमध्ये सामील झालेल्या एका स्पर्धकामुळे. तो स्पर्धक म्हणजे बॉलिवूडचा दिग्दर्शक साजिद खान. स्पर्धक म्हणून त्याने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून प्रेक्षक संतापले आहेत. त्यानंतर आता साजिद खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. काय आहे त्यामागचं कारण जाणून घ्या. चित्रपटसृष्टीतील महिलांवर अत्याचार झाला त्या रोषातून मीटू प्रकरणाला सुरुवात झाली होती. त्यात अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांची नावे समोर आली होती. या प्रकरणात साजिद खानचं सुद्धा नाव समोर आलं होतं. या प्रकरणात अडकल्यामुळे तो चर्चेत आला होता. महिलांचे शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. आता त्यामुळे महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या साजिद खानला ‘बिग बॉस’मध्ये पाहून प्रेक्षक संतापले आहेत. अनेक अभिनेत्रींनीही त्याविषयी संताप व्यक्त केला आहे. त्याला या शो मधून काढण्याची मागणी अनेक महिला प्रेक्षकांकडून होत असताना आता सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मालिवाल यांनीही याला विरोध दर्शविला आहे. हेही वाचा - Amitabh Bachchan Birthday: वाढदिवसाआधी बिग बींचं चाहत्यांना एक अनोखं सरप्राईज; ‘उंचाई’चं पोस्टर रिलीज महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून चित्रपट निर्माता साजिद खानला बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. साजिद खानवर सुमारे 10 महिलांनी MeToo चे आरोप केले होते. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ट्विट करून लिहिले की, ‘MeToo चळवळीदरम्यान साजिद खानवर 10 महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. या सर्व तक्रारी साजिदची घृणास्पद मानसिकता दर्शवतात.
आता अशा व्यक्तीला बिग बॉसमध्ये स्थान देण्यात आले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. साजिद खानला शोमधून काढून टाकण्यासाठी मी अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. साजिद खानला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं आहे.
साजिद खान के ख़िलाफ़ 10 महिलाओं ने #MeToo मूव्मेंट के दौरान यौन शोषण के आरोप लगाए थे। ये सभी कम्प्लेंट साजिद की घिनौनी मानसिकता दिखाती है। अब ऐसे आदमी को Bigg Boss में जगह दी गयी है जो कि पूरी तरह ग़लत है। मैंने @ianuragthakur जी को पत्र लिखा है की साजिद खान को इस शो से हटवाएँ! pic.twitter.com/4ao9elyvkk
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) October 10, 2022
स्वाती मालिवाल या दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. अनुराग ठाकूर यांना पत्र लिहीत त्यांनी साजिद खानला ‘बिग बॉस’मधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. हे पत्र त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलं आहे. या पत्रात त्यांनी साजिद खानवर महिलांनी लावलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल उल्लेख केला आहे. साजिद खानला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून उर्फी जावेदनेही संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री मंदाना करिमी हिने साजिद खानची ‘बिग बॉस’च्या घरात झालेली एन्ट्री पाहून बॉलिवूडला रामराम ठोकला. मंदाना करिमीने साजिद खानवर मीटू मोहिमेअंतर्गत गंभीर आरोप केले होते.