मुंबई, 30 मार्च- ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अतिशय चर्चित आणि तितकाच वादग्रस्त शो समजला जातो. या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. नुकतंच ‘बिग बॉस’चा 16 वा सीजन पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाचा सीजनदेखील धमाकेदार ठरला होता. यावेळीसुद्धा अनेक कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. यातील काही कलाकार असे आहेत ज्यांनी ट्रॉफी तर जिंकली नाही पण लोकांची मने जिंकली आहेत. यामध्ये मराठमोळ्या शिव ठाकरे चादेखील समावेश होतो. बिग बॉसच्या घरात असताना शिव ठाकरेला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा मिळाला होता. अभिनेता हा शो जिंकणार असं जवळजवळ सर्वांनाच वाटत होतं. आणि विशेष म्हणजे शिव टॉप 2 स्पर्धकांमध्ये पोहोचल्याने चाहत्यांच्या अपेक्षा आणखीनच उंचावल्या होत्या. मात्र विजेत्याचं नाव जाहीर झालं आणि शिव ठाकरेचे चाहते नाराज झाले होते. ट्रॉफी जरी जिंकली नसली तरी या मराठमोळ्या मुलाने लोकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. शिव ठाकरेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. याचा प्रत्यय नुकतंच आला. (हे वाचा: Urfi Javed: उर्फी जावेद तृतीयपंथी, स्वत: सांगावं अन्यथा…: प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा ) शिव ठाकरेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये शिव आपल्या चाहत्यांच्या घोळक्यात अडकला आहे. शिव ठाकरे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही सतत चर्चेत आहे. त्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी क्रेझी होत आहेत. शिवही आपल्या चाहत्यांचा मान राखत त्यांच्याशी मोकळेपणाने भेटीगाठी घेत असतो. परंतु या व्हिडीओमध्ये शिव अस्वस्थ झालेला दिसून येत आहे.
प्रसिद्ध पापाराझी विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शिव ठाकरेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून शिवच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. या व्हिडीओमध्ये शिव ठाकरे एके ठिकाणी कार्यक्रमासाठी गेलेला दिसून येत आहे. शिव कार्यक्रमातून परत जात असताना तो चाहत्यांच्या घोळक्यात अडकला आहे. त्याचे चाहते त्याला पाहून वेड्यासारखे करत आहेत. त्याला एकदा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. अशातच शिवच्या बॉडीगार्ड्सनी त्याला या घोळक्यातून बाहेर पडण्यास मदत केली. मात्र या घोळक्यातून शिवला बाहेर काढेपर्यंत त्याच्या बॉडीगार्ड्सचीसुद्धा दमछाक झालेली दिसून आली.
शिव ठाकरेने सर्वात आधी एम टीव्हीवरील ‘रोडीज’ या शो केला होता. या शोमधून त्याला बरीच लोकप्रियता मिळाली होती. त्यांनतर तो मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता. विशेष म्हणजे त्याने हा शो जिंकत ट्रॉफी नावावर केली होती. बिग बॉस १६ मध्ये आल्यापासून शिव ठाकरेच्या लोकप्रियतेत अफाट वाढ झाली आहे.