मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Shocking! बिग बॉसच्या घरात लज्जास्पद कृत्य; अभिजित बिचकुलेनं देवोलिनाकडे मागितलं KISS

Shocking! बिग बॉसच्या घरात लज्जास्पद कृत्य; अभिजित बिचकुलेनं देवोलिनाकडे मागितलं KISS

बिग बॉसच्या घरामध्ये नेहमी काहीना काही गोंधळ सुरू असतो. ज्यामुळे प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन होतं. काही दिवसांपूर्वी अभिजित बिचकुलेनं   (Abhijeet Bichukale)  आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी   (Devoleena Bhattacharjee)  यांची घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे.

पुढे वाचा ...

     मुंबई, 15 डिसेंबर-    सध्या कलर्स टीव्हीवर रिअॅलिटी शो 'बिग बॉस सिझन 15'  (Bigg Boss Season 15)   एकदम रंगात आला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये नेहमी काहीना काही गोंधळ सुरू असतो. ज्यामुळे प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन होतं. काही दिवसांपूर्वी अभिजित बिचकुलेनं   (Abhijeet Bichukale)  आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी   (Devoleena Bhattacharjee)  यांची घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. अभिजित आपल्या अतरंगी वर्तणुकीसाठी प्रसिद्ध आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून त्यानं त्या ठिकाणी देखील आपल्या वागणुकीमुळं खळबळ उडवली आहे. अभिजित, कधी राखी सावंतच्या (Rakhi Sawant) लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना तर कधी घरातील सदस्यांना अपशब्द वापरताना दिसला आहे. आता तर त्यानं असं कृत्य केलं आहे की, ज्यामुळे बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांचाही संयम सुटला आहे. अभिजितने घरातील दोन अभिनेत्रींना जबरदस्ती किस (Forceful Kiss) करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे घरात सध्या गोंधळ उडाला आहे.

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

    नुकताच 'बिग बॉस' शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून येत्या काही दिवसात बिग बॉसच्या घरात मोठा गोंधळ उडण्याची चिन्ह दिसत आहेत. प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिजित बिचकुले देवोलीनाच्या (Devoleena Bhattacharjee) गालांना जबरदस्ती हात लावून 'कब तू मुझे किस करेगी? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. अभिजीतच्या आक्रस्ताळेपणामुळं देवोलीना संतापून जाते आणि त्याला रागात ओरडू लागते. 'जर तू माझ्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल. तू तुझी लाइन क्रास करू नकोस' अशी धमकी ती अभिजितला देते. प्रोमोमध्ये, देवोलीनाच्याशेजारी अभिनेता करण कुंद्रादेखील (Karan Kundra) दिसत आहे. देवोलीनानं घरातील सर्व लोकांसमोर खरडपट्टी काढल्यानंतर अभिजीत आपण तर चेष्टा करत होतो, असं स्पष्टीकरण देतो. मात्र, त्याच्या या उत्तरामुळं घरातील सर्व लोक चिडल्याचं या प्रोमोमध्ये दिसत आहे.

    देवोलीनासोबत अभिजितनं ज्या प्रकारे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तसाच तेजस्वी प्रकाशसोबतही (Tejasswi Prakash) केल्याचं दिसत आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये याबाबत स्पष्टपणे दाखवण्यात आलेलं नाही. मात्र, तेजस्वी अभिजीतवर प्रचंड चिडलेली दाखवलं आहे. 'मी त्याला कानाफाडात मारेन' असं म्हणताना तेजस्वी दिसत आहे. यानंतर तेजस्वीनं अभिजितला धक्कादेखील दिला आहे. यावरून तिच्यासोबतही अभिजितनं वाईट वर्तणूक केल्याचा अंदाज प्रेक्षक लावत आहेत.एकूणचं अभिजित बिचकुलेच्या वर्तणुकीमुळं बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं असून येत्या काळात स्पर्धकांमध्ये जोरदार वाद होण्याची शक्यता आहे.

    First published:

    Tags: Bigg boss, Entertainment