मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: राखी सावंतसमोर पती रितेशनं केलं शमिता शेट्टीला प्रपोज ; त्यानंतर जे घडलं, पाहा VIDEO

Bigg Boss 15: राखी सावंतसमोर पती रितेशनं केलं शमिता शेट्टीला प्रपोज ; त्यानंतर जे घडलं, पाहा VIDEO

बिग बॉस 15   (Bigg Boss 15)   च्या घरात अलीकडे 1-2 नव्हे तर 4 वाईल्ड कार्ड एन्ट्री   (Wild Crad Entry)  झाल्या आहेत. रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी, राखी सावंत   (Rakhi Sawant)  आणि तिचा पती रितेश   (Husband Ritesh)  यांनी वाईल्ड कार्ड म्हणून घरात प्रवेश केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बिग बॉस 15   (Bigg Boss 15)   च्या घरात अलीकडे 1-2 नव्हे तर 4 वाईल्ड कार्ड एन्ट्री   (Wild Crad Entry)  झाल्या आहेत. रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी, राखी सावंत   (Rakhi Sawant)  आणि तिचा पती रितेश   (Husband Ritesh)  यांनी वाईल्ड कार्ड म्हणून घरात प्रवेश केला आहे. राखी आणि रितेशच्या एन्ट्रीचा प्रेक्षक खूप आनंद घेत आहेत. राखीने घरात प्रवेश केल्यापासून घरातील वातावरण बदलले आहे. प्रत्येक वेळी बिग बॉसचे घर टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजत असते. राखीप्रमाणेच तिचा पती रितेशही कुटुंब आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

परंतु, नुकताच रितेशने असं काही केलं आहे ज्याने स्वतः शोचा होस्ट सलमान खानदेखील आश्चर्यचकित झाला आहे. शोमध्ये येताच रितेशने राखी सावंतसमोर दुसऱ्याच व्यक्तीला प्रपोज केलं आहे. रितेश सर्वांसमोर अभिनेत्री शमिता शेट्टीसोबत फ्लर्ट करताना दिसला.रितेशला शमितासोबत फ्लर्ट करताना पाहून सलमान खाननेही तिची खूप फिरकी घेतली आणि तिला सांगितले- 'हे बिग ब्रदरचे नाही तर बिग बॉसचे घर आहे.' खरे तर चॅनलने आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. ज्यामध्ये राखीची फनी स्टाइल आहे. पती रितेशची छाप पडली आहे.

व्हिडिओची सुरुवात सलमान खानपासून होते. ज्यामध्ये तो म्हणतो- 'रितेशने मला सांगितले की त्याला शमिता शेट्टी खूप आवडते.' सलमानचे बोलणे ऐकून राखी, शमिता आणि कुटुंबातील इतर सदस्यही आश्चर्यचकित झाले आहेत.यानंतर रितेशला शमिताला प्रपोज करण्याची संधी दिली जाते. संधी मिळताच रितेशही राखीला सोडून शमिताला गुलाब देऊन प्रपोज करण्यासाठी पुढे जातो. शमिताला प्रपोज करताना रितेश इंग्रजी भाषेचा वापर करतो, ज्यावर सलमान हसतो आणि म्हणतो की हा अमेरिकन शो बिग ब्रदर नसून बिग बॉस आहे. हे ऐकून घरातील सर्व सदस्य हसू लागतात.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Rakhi sawant