मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात राकेश बापट शमिताला घालणार लग्नाची मागणी? वाचा काय म्हणाला अभिनेता

Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात राकेश बापट शमिताला घालणार लग्नाची मागणी? वाचा काय म्हणाला अभिनेता

 शमिता शेट्टी या शोमध्ये स्पर्धक म्हणून उपस्थित आहे.  तर राकेश गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्ड एंट्री  (Wild Card Entry)  म्हणून सहभागी झाला आहे.

शमिता शेट्टी या शोमध्ये स्पर्धक म्हणून उपस्थित आहे. तर राकेश गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्ड एंट्री (Wild Card Entry) म्हणून सहभागी झाला आहे.

शमिता शेट्टी या शोमध्ये स्पर्धक म्हणून उपस्थित आहे. तर राकेश गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्ड एंट्री (Wild Card Entry) म्हणून सहभागी झाला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,9 नोव्हेंबर- 'बिग बॉस 15'  (Bigg Boss 15)  या रिअॅलिटी शोमध्ये शमिता शेट्टीला  (Shamita Shetty)  लग्नासाठी प्रपोज करणार नसल्याचे राकेश बापटने  (Rakesh Bapat)  म्हटले आहे. शमिता शेट्टी या शोमध्ये स्पर्धक म्हणून उपस्थित आहे.  तर राकेश गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्ड एंट्री  (Wild Card Entry)  म्हणून सहभागी झाला आहे. 'बिग बॉस 15' मध्ये प्रवेश करण्यापूर्वी लीडिंग डेलीशी बोलताना राकेश बापटनं म्हटलं की, मी शमिताला कधीही नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नासाठी प्रपोज करणार नाही. ती आमच्यासाठी वैयक्तिक भावना आहे. जेव्हा हे घडेल तेव्हा ते शोच्या बाहेर घडेल, शोमध्ये नाही. हा आमच्यासाठी खूप खास क्षण असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

राकेश बापट आणि शमिता शेट्टी या वर्षाच्या सुरुवातीला 'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सीझनमध्ये एकत्र काम दिसले होते. या शो दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शमिता शेट्टीसोबत बिग बॉसच्या घरात कोणत्याही प्रकारच्या पीडीएमध्ये सहभागी होणार का असे विचारल्यावर राकेश म्हणाला, “मी बिग बॉसमध्ये प्रवेश करत आहे. शमिता आणि मी एक जोडपे बनू. पण त्याचवेळी आम्ही आमचा वैयक्तिक खेळही खेळू. आम्ही नक्कीच एकमेकांच्या विरोधात उभे राहणार नाही."

बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी राकेश बापटनं  एका निवेदनात म्हटलं  होतं  की, शमिता हेच या रिअॅलिटी शोमध्ये जाण्याचे कारण आहे. तो म्हणाला, “प्रेम… एक असा शब्द आहे ज्याला खूप अर्थ आहे. माझ्या प्रेक्षकांचे, मी घरी परत यावे यासाठी सतत मेसेज करणाऱ्या, ट्विट करणाऱ्या सर्व चाहत्यांचे प्रेम चुंबकासारखे काम करत आहे. आणि हो, शमिता जी मला OTT सीझनमध्ये या प्रवासादरम्यान भेटली आणि मी तिच्यासोबत पुन्हा एकदा विचित्र घरात, बिग बॉसच्या घरात काही वेळ घालवण्यास उत्सुक आहे.

राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांनी शोमध्ये त्यांच्या जवळीकतेसाठी खूपच चर्चेत आले होते. , परंतु राकेशने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले होते की बिग बॉस ओटीटीमधून बाहेर आल्यानंतर तो आणि शमिता एकेमकांना अधिकृतपणे डेटिंग करत नाहीयत. यावर राकेश म्हणाले, “या बॉण्डला कोणतेही नाव देण्याआधी, आम्हाला एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचे आहे. मला कशाचीही घाई करायची नाही आणि मला खात्री आहे की तिलाही तसंच वाटत असेल."

First published:

Tags: Bigg boss, Entertainment