मुंबई, 3 नोव्हेंबर- 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये स्पर्धक सिंबा नागपालने उमर रियाजला पूलमध्ये ढकलल्याचे दाखवण्यात आले. पूलमधून बाहेर पडल्यानंतर उमर धापा टाकताना दिसला. सिम्बाच्या या हिंसक वागणुकीमुळे प्रेक्षक संतप्त झाले आहेत. लोकांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आणि 'जस्टिस फॉर उमर रियाझ' ट्रेंडिंग झाला. उमर रियाझला 'दहशतवादी' संबोधल्याबद्दल आणि टास्क दरम्यान अँटीमनी लागू न केल्याबद्दल त्यांनी सिम्बावर टीका केली. इतकेच नाही तर अनेक सेलेब्सनी ओमरचे समर्थन करत सिम्बावर टीकाही केली.
It will hurt @realumarriaz It will take time, It will require dedication It will require will power You will need to make healthy decisions You will have to sacrifice,You will have to push your body to the max but I promise you this, when u reach your goal,It will be worth it.
— Asim Riaz (@imrealasim) November 2, 2021
असीम रियाझ ट्विट-
उमर रियाझचा भाऊ असीम रियाझने ट्विटमध्ये त्याचे समर्थन केले आणि लिहिले, “तुम्ही दु:खी व्हाल. तुम्हाला वेळ लागेल आपण अधिक समर्पित असणे आवश्यक आहे. तुम्हाला अधिक शक्ती लागेल. तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. त्याग करावा लागेल. तुम्हाला स्वतःला जास्तीत जास्त स्वतःला पुढं ढकललं पाहिजे परंतु मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही तुमच्या इच्छित स्थानावर पोहोचाल. आणि तेव्हा या सगळ्याचा अर्थ खूप मोठा असेल.
Chahe support kro ya nahi kro .... yaha galt sahi lagta or sahi galt...kitna bhi bolo kuch nahi hone wala ..but kisi ko boli hui baat hmesha uska picha krti hai.but har saal yaha rule badal jate..terrorist is that a word you are using for person? But fir bhi simbha hi sahi hoga
— Himanshi khurana (@realhimanshi) November 2, 2021
हिमांशी खुराना ट्विस्ट-
हिमांशी खुरानानेही उमरला पाठिंबा दिलाआहे . तिने ट्विट करून लिहिलं की, "समर्थन असो वा नसो, इथे चूक बरोबर दिसते आणि बरोबर चूक... तुम्ही कितीही बोललात तरी काहीही होणार नाही.. पण कोणाशी जे बोलले जाते ते नेहमी त्याचा पाठलाग करते. पण इथे दरवर्षी नियम बदलतात… तुम्ही माणसासाठी दहशतवादी हा शब्द वापरताय का? पण तरीही सिम्बा बरोबर असेल."अशा पद्धतीने हिमांशीने सिम्बाचा विरोध केला आहे.
(हे वाचा:HBD: फक्त मॅरिडच नव्हे तर एका मुलाची आई आहे सौम्या टंडन; 'भाभी जी....'मधून....)
'बिग बॉस 15' मधून बाहेर पडलेल्या विधी पंड्यानेही उमर रियाजला पाठिंबा दिला आहे. तिने लिहिललं आहे, "होय मला याची जाणीव आहे, उमरने ते माझ्यासोबत घरात शेअर केलं होतं पण सिंबा गोड आहे असं म्हणत त्यानं ते सोडलं होत. मला खात्री आहे की त्याचा असा अर्थ नव्हता पण स्पष्टपणे ते चुकीचे आहे आणि हा उमरचा चांगुलपणा आहे. ठाम राहा उमर. तुम्ही यातून यशस्वी बाहेर पडाल." त्याचवेळी सोशल मीडियावर #EvictSimbanow ट्रेंड करत आहे. सिंबा नागपालला बिग बॉस 15 मधून बाहेर काढण्याची मागणी युजर्स सोशल मीडियावर करत आहेत. उमर रियाझचे चाहते सिम्बावर प्रचंड नाराज आहेत. सिंबालाही खूप ट्रोल केले जात आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment