मुंबई, 18 मार्च- टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक कायमच चर्चेत असते. रुबीना दिलैक ही तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. रूबीना सध्या तिच्या गावी पोहचली आहे. रूबीना मुळची हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाची राहणारी आहे. ती नेहमी तिच्या गावाकडं येत असते व तिथले काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकतचं रूबीनाची बहीण ज्योतिका दिलैक हिचं लग्न झालं. या लग्नासाठी ती नवरा अभिनव शुक्लासोबत गावी आली होतं. रूबीनानं तिच्या इन्स्डटाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गावकडं कशाप्रकारे ती राहिली हे शेअर केलं आहे.
रूबीना दिलैकनं जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये दिसत आहे ती पर्वत रांगांमध्ये मस्त भटंकती करत आहे. ती सकाळी उठून मस्त मॉर्निंग वॉकला जातेय. शिवाय अधूनमधून कुत्र्यासोबच खेळताना दिसत आहे. तसेच वॉकनंतर ती नवऱ्यासोबत मस्त हिमाचल स्टाईल लंचचा आनंद घेताना दिसत आहे.
वाचा-पतीने सोडलं, बॉयफ्रेंडने वेश्या व्यवसायात ढकललं; श्रीमंत अभिनेत्रीचा भयानक शेवट
रुबीना दिलैक आणि तिचा नवार अभिनव शुक्ला आणि कुटुंबातील इतर सदस्य कार्पेटवर बसून मस्त जेवण करताना दिसत आहेत. दुपारच्या जेवणात तो हिमालच प्रदेशचे पारंपारिक पदार्थ खाताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये रुबीना हिमाचल प्रदेशचा पारंपरिक ड्रेस परिधान करून बहिणींसोबत हॅंगआऊट आणि त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे.
View this post on Instagram
रुबीनानं शेतात जाऊन खाल्या वाटाण्याच्या शेंगा
रूबीनानं यावेळी नवऱा अभिनव शुक्लासोबत तिथल्या लोकलं बाजारात जाऊन शेतातल्या ताज्या भाज्या विकत घेतल्या. शिवाय तिनं शेतात जाऊन ताज्या वाटाण्याच्या शेंगा खाल्या. तिचा दिवस इथचं संपत नाही. तर ती घरच्या मंडळीसोबत मंदिरात देखील जाताना दिसत आहे.
रुबीना दिलैक गावकडची लाईफ एन्जॉय करताना दिसली
रुबीना दिलैकने कुटुंबासोबत एक छान फोटोशेसन केलं. हा व्हिडिओ शेअर करताना तिनं म्हटलं आहे की, 'एकदम शुद्ध'. फोटोसह पोस्ट शेअर करताना तिनं लिहिले आहे की, "हे माझं साधं आणिसमृद्ध आयुष्य आहे..."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg Boss 16, Entertainment, TV serials